'ती' काळजी माझ्याकडून घेतली जाईल, सरकारच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया

'ती' काळजी माझ्याकडून घेतली जाईल, सरकारच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया

'पाण्याच्या प्रश्नावरून भागा-भागात किंवा जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होऊ नये'

  • Share this:

जितेंद्र जाधव, 5 जून : 'सबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अशावेळी या प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नावरून भागा-भागांत किंवा जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी आणि ती काळजी माझ्याकडून घेतली जाईल,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या पाण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याचा सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत बोलताना शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे. 'राजकारण करावं. पण कुठं आणि कधी याचं तारतम्य राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

'इथेही लोकच राहतात आणि तिकडेही लोकच राहतात. आता ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी ठरवावं कुणाला आणि कसं पाणी द्यायचं,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीप्रश्नावर आली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याबाबत सरकार करत असलेल्या हालाचालींवरून राज्यात आता राजकारण तापू लागलं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असंही महाजन म्हणाले आहेत.

याबाबतच आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्हाला आता दुष्काळात राजकारण करायचं नाही. दुष्काळात प्राथमिकता लोकांना पाणी देण्याची आणि जनावर जगवण्याची आहे. आता बाकीचे प्रश्न आणि नंतर राजकारण नंतर,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

VIDEO: दूध उत्पादकांसाठी खुशखबर! 8 जूनपासून लागू होणार नवे दर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading