मुंबई, 18 फेब्रुवारी : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.
'भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमासाठी लोक कोरेगावात येतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. पण यामध्ये संभाजी भिडे आणि अनिक एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं. त्यावेळी नक्की काय झालं हे बाहेर येईन' असं शरद पावर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 'सध्या भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध जोडला जात आहे. पण एल्गार परिषद ही वेगळी आहे. एल्गार परिषद ही भीमा कोरेगावच्या काही दिवसांआधी झाली होती. 100 पेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षपद नि. न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु प्रकृती खालावल्याने ते येऊ शकले नाहीत.'
'यावेळी हजर नसलेल्या लोकांवरही खटले दाखल करण्यात आले. जे लोक नव्हते त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. यावेळी दंगलीपूर्वी वातावरण निर्मिती केली गेली होती. सुजित ढवळेंनी कविता वाचली म्हणून त्यांना अटक केली गेली. ही कविता नामदेव ढसाळांची होती. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ही ती कविता होती. कुसुमाग्रजांच्याही कविता आक्रमक असतात' असं शरद पवार म्हणाले
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- कोरेगाव भीमा वेगळा कार्यक्रम आहे
- अनेक वर्षांपासून लोक कार्यक्रमासाठी जमतात
- विजय स्तंभाला अनेक वर्ष अभिवादन
- भीमा कोरेगावला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली
- ब्रिटीशांच्या बाजूने काही भारतीयही लढले
- स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये काहीही कुटुता नव्हती
- संभाजी भिडे आणि एकबोटेंकडून वादामध्ये वेगळं वातावरण तयार केलं
- कोरेगाव आणि एनआरसी वेगळे विषय
- न्यायमुर्ती सावंत यांची प्रकृती बिघडली म्हणून आले नाही
- एल्गारशी संबंध नसलेल्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले
- एल्गार परिषदेत 100 हून अधिक संघटना
- हजर नसलेल्यांवरही खटले दाखल करण्यात आले
- दंगलीपूर्वी वातावरण निर्मिती केली गेली
- कविता वाचली म्हणून सुजित ढवळेंना अटक केली
- ही कविता नामदेव ढसाळांची होती
- कुसुमाग्रजांच्याही कविता आक्रमक आहे
- आमची तक्रार पोलिसांच्या विरोधात
- पोलिसांत्या मागे सरकारमधील लोक आहेत
- पोलीस आणि सरकारमधील लोकांची चौकशी व्हावी
- पोलीस लोकांसमोर आले पाहिजे
- केंद्राने एवढी तत्परात का दाखवली
- पोलीस आणि तात्कालिन सरकारकडून सत्तेचा गैरवापर
- मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताच केद्रांने तपास घेतला
- आक्रमक असणे देशविरोधी नाही
- राज्य सरकारने जे करायचं ते करावं
- मला फक्त सगळ्याची चौकशी होऊन ते लोकांसमोर आणायचं आहे
- एल्गार परिषदेत चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे
- एल्गार परिषदेमध्ये शपथ घेण्यात आली होती. यावर माझा आक्षेप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Maharashtra, Sharad pawar