...नाहीतर शेतकरी कधी तुरीचं पीक घेणार नाही -शरद पवार

...नाहीतर शेतकरी कधी तुरीचं पीक घेणार नाही -शरद पवार

सरकारने काहीही करावं मात्र शेतकऱ्यांची तूर खरेदी करावीच अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय

  • Share this:

25 एप्रिल : सरकारने काहीही करावं मात्र शेतकऱ्यांची तूर खरेदी करावीच अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. तसंच आता जर शेतकऱ्यांना दिलासा दिला नाहीतर तो कधीच तूर खरेदी करणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आयबीएन लोकमतशी बोलताना शरद पवारांनी राज्य सरकाराने  तुरीचा शेवटचा दाणा संपेपर्यंत सरकारने तूर खरेदी करावी. तूर हा नाशिवंत पदार्थ नाही. त्यामुळे ती खरेदी करण्यात उशीर झाला तरी चालेल अशी मागणीही केली.

तेल आणि डाळींमध्ये भारत अजूनही आयातदार देश आहे.  आता जर तूर उत्पादक शेतकरी भरडला गेला तर तो पुन्हा कधीच तूर पीक घेणार नाही अशी भीतीही शरद पवारांनी व्यक्त केली. या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचीही टीकाही शरद पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 04:14 PM IST

ताज्या बातम्या