सोशल मीडियावरील लिखाणाविरोधात युवकांना नोटीस पाठवणं गैर- शरद पवार

सोशल मीडियावरील लिखाणाविरोधात युवकांना नोटीस पाठवणं गैर- शरद पवार

सोशल मीडियावर लिखान केल्याप्रकरणी पोलिसांकडून नोटीसा मिळालेल्या तरूणांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरणही जाणून घेतलं. तसंच सोशल मिडियाविरोधातील पोलिसांच्या या दडपशाहीचा शरद पवारांनी निषेधही व्यक्त केला.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : सोशल मीडियावर लिखान केल्याप्रकरणी पोलिसांकडून नोटीसा मिळालेल्या तरूणांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरणही जाणून घेतलं. तसंच सोशल मिडियाविरोधातील पोलिसांच्या या दडपशाहीचा शरद पवारांनी निषेधही व्यक्त केला.

सोशल मिडीयावर काम करणारे हे तरूण काही राजकीय पक्षाचे नाहीत. हे तरूण लिहीतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जे लिहितायेत त्यांना दमदाटी केली. एका तरूणाला तर कस्टडीमध्ये ठेवलं गेलं. कुठल्या आधारावर केलं. मुख्यमंत्री कार्यालयात एक ओएसडी आहेत त्यांच्या माध्यमातून हे होत आहे. सरकारी अधिकारी असं करतात हा शासकीय शिस्तीचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या तरूणांच्या पाठीशी आम्ही मजबूतीने उभे राहू. काही कायदेशीर सल्लागारांना सोबत घेऊन त्यांना आम्ही मदत करू, असंही शरद पवारांनी म्हटलंय. देव गायकवाड या फेक अकाऊंट मोदी विरोधात बदनामीकारक मजकूर लिहिला गेला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी सोशल मीडियावर लिहिणाऱ्या 25 युवकांना नोटीसा पाठवल्यात. त्याविरोधात सोशल माध्यमातून तीव्र नापंसती व्यक्त होतेय. राष्ट्रवादीने हे प्रकरण उचलून धरलंय.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.

सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरीकडे, महेंद्र रावले यासह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 02:51 PM IST

ताज्या बातम्या