उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत शरद पवार काय म्हणाले ? आणि या भेटीमागचा नेमका 'अन्वयार्थ'

उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत शरद पवार काय म्हणाले ? आणि या भेटीमागचा नेमका 'अन्वयार्थ'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता सध्यातरी फेटाळून लावलीय. भाजपवर नाराज असलेल्या उद्धव ठाकरेंनी दहा दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याचं वृत्तं आज दुपारी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना ऊत आलाय. त्यावर शरद पवारांनी हे सष्टीकरण दिलंय.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता सध्यातरी फेटाळून लावलीय. भाजपवर नाराज असलेल्या उद्धव ठाकरेंनी दहा दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्याचं वृत्तं आज दुपारी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना ऊत आलाय. त्यावर शरद पवारांनी हे सष्टीकरण दिलंय.

शरद पवार म्हणाले, ''होय दहा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मला भेटले पण आमच्यात तशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, त्या दोघांच्या बोलण्यातून ते सरकारमध्ये नाराज असल्याचं जाणवलं पण ते लगेच सरकारमधून बाहेर पडतील, असं ते कुठेही स्पष्ट बोलले नाहीत''

शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास तुम्ही भाजपसोबत जाणार की शिवसेनेसोबत असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी आम्ही गेलोच समविचारी पक्षांसोबत जाऊ पण जातीयवादी पक्षांसाठी अजिबात उपलब्ध नसू, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या बोलण्यातून त्यांनी सध्यातरी कोणासोबतच जाणार नसल्याचं म्हटलंय. पण शरद पवारांचा पूर्व इतिहास पाहता ते कधी कोणता निर्णय घेतील याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही. 2014साली याच पवारांनी शिवसेनेचे सत्तास्थापनेतील 'बार्गेनिंग पॉवर' कमी करण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. कदाचित म्हणूनच नारायण राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशावरून अस्वस्थ असलेल्या उद्धव ठाकरेंनी शरद पवार पुन्हा भाजपला पाठिंबा तर देणार नाहीना याची चाचपणी केली असावी, अर्थात या भेटीदरम्यान या दोन पक्षप्रमुखांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकलं नसलं तरी शिवसेनेच्या सावध भूमिकेवरून तरी पवारांनी उद्धव ठाकरेंना कुठलंच ठोस आश्वासन दिलं नसावं, असं दिसतंय. पण सेनेनं पाठिंबा काढल्यास आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट संकेतही पवारांनी त्यांच्या बोलण्यातून दिलेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, यासाठी भाजपवर राजकीय दबाव वाढवण्यासाठीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांच्या गुप्त बैठकीची जाणिवपूर्वक ही अशी उघड राजकीय चर्चा घडवून आणली असावी, असं बोललं जातंय.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष बापट यांना विचारलं असता त्यांनी ही दोन वैफल्यग्रस्त मित्र पक्षांची भेट असून राज्यातलं भाजपचं सरकार आजही भरभक्कम आहे, त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हटलंय.

First Published: Nov 7, 2017 09:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading