S M L

महाआघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

'देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही त्यामुळं त्याचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही, निवडणूकीनंतर काय होतं ते बघू'

Ajay Kautikwar | Updated On: Jun 25, 2018 10:03 AM IST

महाआघाडीची शक्यता नाही, राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नसल्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

विनया देशपांडे, मुंबई,ता.24 जून : भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार धक्का दिलाय. देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही त्यामुळं त्याचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही, असं पवार यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं.

त्यामुळं महाघाडीचा चेहेरा कोण असेल याचा प्रश्नच नाही. देशातल्या सर्वच राजकीय पक्षांशी शरद पवार यांचे उत्तम संबंध आहेत. आणि अशा प्रयत्नांमध्ये पवार चाणक्य समजले जातात. मात्र शरद पवारांचं आजचं वक्तव्य हे भाजपच्या पथ्यावर पडू शकते. तसच राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नसेल याचेही स्पष्ट संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

महाआघाडी

देशात अशी कुठलीही शक्यता दिसत नाही. महाआघाडीची चर्चा वारंवार होत असते. महाआघाडी होणार असेल तर मी त्यात आड येणार नाही मात्र अशी शक्यता दिसत नाही. त्यापेक्षा निवडणूकीनंतर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी आहे. तिथे भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावं हेच उद्दीष्ट ठेवलं पाहिजे. निवडणूकीनंतर सर्व पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा पर्याय स्विकारला पाहिजे.

Loading...
Loading...

राहुल गांधी आघाडीचा चेहेरा?

महाआघाडीचं नेतृत्व कुणी करावं हा सध्या प्रश्नच नाही. भाजपचा पराभव करणं हे आमचं उद्दीष्ट आहे. अर्जुनाच्या डोळ्याप्रमाणे सध्या आम्हीचं तेच एकमेव उद्दीष्ट आहे आणि त्यासाठीच आम्ही काम करतोय. निवडणूकीनंतर कुठल्या पक्षाला किती जागा मिळातात ते बघावं लागेल. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं आत्ताच कुणाचं नाव कशासाठी घ्यायचं? निवडणूकीनंतर चेहेरा कोण असेल ते बघू. निवडणूकीनंतर सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्रात काय होणार?

महाराष्ट्रात भाजप विरोधातले सर्वपक्ष एकत्र येवू, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, डॉ. आंबेडकरांच्या विचारांना मानणारे पक्ष एकत्र यावेत असा आमचा प्रयत्न आहे. या पक्षांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार दयावा असा प्रयत्न आहे. 15 वर्षांपूर्वी आम्ही असं सरकार दिलं होतं.

शिवसेना, मनसेला सोबत घेणार का?

शिवसेनेचा दृष्टीकोण हा संघटना वाढविण्याचा आहे, त्यामुळं त स्वबळावर लढतील असं वाटतं. एकदा भूमिका घेतल्यानंतर ते त्यात बदल करत नाही असा त्यांचा स्वभाव आहे. त्याबाबत चर्चा अजुन कुणाशीही झाली नाही. राज ठाकरे यांची भूमिका ठरलेली आहे. त्यांनी भाजपला सक्त विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. ते स्पष्टपणे भूमिका घेतात हेच त्यांचं वैशिष्ट आहे. ते त्यांच्या मार्गाने जातील.

देशात अघोषित आणीबाणी

देशात सध्या भीतीचं वातावरण असून भाजपनं अघोषीत आणीबाणी लादली आहे. सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सामाजिक सलोखा बिघडवून मतांचं राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप हा दहातोंडाचा रावण आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीर सरकारचा पाठिंबा काढणं हे दुर्दैवी आहे. भाजप पुन्हा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतेय. आता राज्यपालांनी राज्यातलं वातावरण आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे. भाजपची भूमिका ही देशाच्या हिताला बाधक आहे. भाजप तिथे राज्यपालांवर नियंत्रण ठेवून काम करेल. या सगळ्या घटनांमुळे तिथला तरूण आणखी आक्रमक होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 06:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close