मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मराठा आरक्षण ते कंगना आणि ड्रग्ज व्यापार, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

मराठा आरक्षण ते कंगना आणि ड्रग्ज व्यापार, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : राज्यात सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना एकीकडे मराठा आरक्षण, कंगना विरुद्ध शिवसेना, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अशा मुद्दे आता जोर धरत आहेत. मराठा आरक्षणाला कोर्टाकडून स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर विरोधकांवर प्रत्युत्तर दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण. कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर भाजपकडून राज्य सरकारला टार्गेट केलं जात होतं. पण भाजप सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपच्या टिकांवर उत्तर दिलं आहे. 'फडणवीसांना प्रश्न सोडवण्यास इंटरेस्ट नाही त्यांना राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. सुप्रीम कोर्टाने दक्षिणेसाठी एक वेगळा न्याय आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय असं केलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद करण्याची गरज नाही. देशात 60 टक्के आरक्षण दिल्या गेलं आहे. हे आरक्षण टिकेल असें मला वाटतं' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात अजित पवारांनी तातडीने दिला महत्त्वाचा आदेश

ते पुढे म्हणाले की, 'आपण सामंजस्याने निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायला नको. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर अध्यादेशाचा पर्याय आहे. अध्यादेश काढल्यास आंदोलन होणार नाही. त्यामुळे विरोधकांना राजकारण करायचं आहे. पण आम्हाला न्याय द्यायचा आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर बाण सोडला आहे.

नागपूरकरांनी अडवली तुकाराम मुंढेंची गाडी, बदलीनंतर मुंबईला येताना घडला प्रकार

कंगना विरुद्ध शिवसेना प्रकरणात काय म्हणाले शरद पवार?

कंगनावरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई ही पालिकेने केलेली कारवाई आहे. त्यामुळे त्याचा राज्य सरकारशी संबंध नाही. तर यावषियी शिवसेनेच्या भूमिकेवर मी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली तर ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांनी लक्ष घालावं. ड्रग्ज निमित्याने चुकीचा व्यवसाय पुढे येत आहे त्यामुळे मुंबई पोलिसांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Coronavirus, Lockdown, NCP, Sharad pawar