लोकांना अजूनही मीच राज्यकर्ता वाटतो !- शरद पवार

लोकांना अजूनही मीच राज्यकर्ता वाटतो !- शरद पवार

राज्याचे मुख्यमंत्रीपद तब्बल 4 वेळा भुषवलेले शरद पवार हे खरंतर आता सत्तेत नाहीत...पण मोदींसारख्या सत्ताधिशांशी मैत्रीपूर्ण राखत हेच पवार राज्यभर विरोधकांची भूमिका भरभक्कमपणे निभावत असतात. पण राज्यातली जनता मात्र, अजून त्यांना विरोधक मानायला तयार नाहीत. ही खंत खुद्द शरद पवारांनी चंद्रपुरात बोलून दाखवलीय. लोकांना अजूनही शरद पवारच मुख्यमंत्री वाटत असल्याचं खुद्द पवारांनी म्हटलंय.

  • Share this:

16 नोव्हेंबर, चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्रीपद तब्बल 4 वेळा भुषवलेले शरद पवार हे खरंतर आता सत्तेत नाहीत...पण मोदींसारख्या सत्ताधिशांशी मैत्रीपूर्ण राखत हेच पवार राज्यभर विरोधकांची भूमिका भरभक्कमपणे निभावत असतात. पण राज्यातली जनता मात्र, अजून त्यांना विरोधक मानायला तयार नाहीत. ही खंत खुद्द शरद पवारांनी चंद्रपुरात बोलून दाखवलीय. लोकांना अजूनही शरद पवारच मुख्यमंत्री वाटत असल्याचं खुद्द पवारांनी म्हटलंय. सध्याचं सरकार निष्क्रिय असल्याचं पवारांनी त्यांच्या या वक्तव्यातून सूचित केलं. राज्यातल्या लोकांना जेव्हा भेटतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळी त्यांना आपण राज्यकर्ते वाटत असल्याचं जाणवतं असंही पवार म्हणाल

शरद पवार म्हणाले, ''राज्यात कुठेही फिरत असताना प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे मी अजुनही राज्यकर्ता आहे, अशी भावना लोकांमध्ये जाणवते, राज्यात मी जिथं कुठे जातो, तिथं अजूनही लोक माझ्याकडे समस्या सोडवण्यासाठी घेऊन येतात, त्यांच्या मागण्यांची निवेदनं देतात. यावरून राज्यातलं फडणवीस सरकार अजूनही आपल्या कामाचा ठसा उमटू शकलेलं नाही, हेच सूचित होतंय.''

शरद पवार सध्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते ठिकठिकाणी सभा-मेळावे घेताहेत, लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेताहेत. यासोबतच विदर्भात राष्ट्रवादीचं कमकुवत झालेलं संघटनही पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करताहेत. पण लोक अजूनही त्यांच्याकडे राज्यकर्तेच म्हणून पाहात असल्याने त्यांची चांगलीच अडचण होताना दिसतेय.

दरम्यान, या विदर्भ दौऱ्यातही शरद पवारांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारला टीकेचं लक्षं केलंय. तसंच केंद्रातलं मोदींचं सरकार हे फक्त सूडभावनेतून वागत असल्याचा आरोप केलाय. मोदींनी गेल्या तीन कुठलाच विकास केला नसल्यानेच त्यांना आता गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधीची भीती वाटत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय

First published: November 16, 2017, 9:22 PM IST

ताज्या बातम्या