मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नाशिक दौरा रद्द करून शरद पवार तातडीने मुंबईत दाखल, उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

नाशिक दौरा रद्द करून शरद पवार तातडीने मुंबईत दाखल, उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

शरद पवार हे जळगावहून फक्त 10 मिनिटांसाठी नाशकात आले होते. तिथे छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं. नंतर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून नंतर पवार हे मुंबईला गेले

शरद पवार हे जळगावहून फक्त 10 मिनिटांसाठी नाशकात आले होते. तिथे छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं. नंतर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून नंतर पवार हे मुंबईला गेले

शरद पवार हे जळगावहून फक्त 10 मिनिटांसाठी नाशकात आले होते. तिथे छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं. नंतर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून नंतर पवार हे मुंबईला गेले

नाशिक 16 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गेले दोन दिवस जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा आज नाशिक दौऱ्या होता. मात्र हा दौरा रद्द करत पवार हे तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक मुंबई बोलावण्यात आली असून त्यात पवार हे सगळ्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. एल्गार परिषदेचा तपास NIAला सोपविल्याप्रकरणी पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याने त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद पवार हे जळगावहून फक्त 10 मिनिटांसाठी नाशकात आले होते. तिथे छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलं. नंतर हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरून नंतर पवार हे मुंबईला गेले. आज सायंकाळी राज्य वकील परिषदेचा पवार यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार होता. मात्र गेल्या दोन दिवसात जळगांव जिल्हा दौऱ्यात दगदग झाल्याने त्यांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पवारांना सर्दी, पडस्यांनेही बेजार केलंय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांच्या सोबत दौऱ्यात पत्नी प्रतिभाताईही त्यांच्या सोबत होत्या. दरम्यान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक उद्या मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 वाजता बोलावण्यात आलीय. महाविकास आघाडी सरकारचा कारभार आणि घेतलेल्या निर्णयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. खेड शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन पेटलं, आंदोलकांनी अडवला एक्सप्रेस वे एल्गार परिषद तपास एनआयए देणे त्यास एनसीपीचा असेलेला विरोध, अल्पसंख्यक मुस्लिम समाज आरक्षण, तसच येणारे अर्थसंकल्प अधिवेशन यावरही होणार या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

केजरीवालांची 'फुकट'योजना राज्यात नको, पवारांनी काँग्रेसच्या मंत्र्याला फटकारलं

या आधी जळगावात बोलताना पवार म्हणाले की, सध्या  कोणतेही असे क्षेत्र नाही ज्यात मंदी नाही. अशावेळेस ज्याच्या हातात सत्ता आहे त्याचावर ही जबाबदारी आहे, असली पाहिजे की आपण देशात गुंतवणूकीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे.  पायाभूत सुविधा,  सिंचन अशा सेक्टरमध्ये  जास्तीत जास्त आपण कशी गुंतवणूक करू शकू. या साठी केंद्र सरकार ने याआधी ही यासाठी  पाऊले उचललेले नाही व ही मंदी कमी करण्यासाठी लक्ष देण्याची गरज होती ती केंद्र सरकारने दिले नाही. त्यामुळे याची किंमत सामान्य जनतेला द्यावी लागते आहे.
First published:

Tags: Ncp sharad pawar

पुढील बातम्या