शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

  • Share this:

26 एप्रिल : राष्ट्रपतीपदीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी जाऊन शरद पवारांनी भेट घेतलीये. शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. शरद पवारांच्या याआधी नितीशकुमार, लालुप्रसाद यादव आणि सिताराम येचुरी यांनीही भेट घेतली. राष्ट्रपतीपदाची चर्चा सुरू असताना शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 08:23 PM IST

ताज्या बातम्या