शरद पवारांच्या आदेशानंतरही पार्थ लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

शरद पवारांच्या आदेशानंतरही पार्थ लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

एकीकडे पार्थ पवारांच्या एन्ट्रीची चर्चा रंगत असताना लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त शरद पवार निवडणूक लढवणार. यात अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नसल्याचं दस्तरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलं होतं.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मावळ, 04 मार्च : मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. पण या सगळ्यात पार्थ पवार हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या समोर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? या प्रश्नावर अनेक खलबतं सुरू आहेत. अमोल कोल्हे, स्मिता पाटील यांसह अनेक नाव चर्चेत आली. पण एका नावावर शिक्कामोर्तब होतोय तो म्हणजे पार्थ अजित पवार...

पार्थ पवारांची राजकारणातील एन्ट्री

-  पनवेल, कर्जत, उरण, मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्र

- राष्ट्रवादी आणि शेकापची युती

- पनवेल, कर्जत उरणमध्ये शेकाप आणि काँग्रेसंची ताकद

- मावळ, पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद

- मोदी लाटेत केवळ 80 हजारांनी राष्ट्रवादीचा पराभव

- पार्थ नवा चेहरा आहे. त्यामुळे पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला...

- पार्थमुळे अंतर्गत गट-तट बाजूला

मावळ हा मतदार संघ शेकपला सुटेल अशी शक्यता होती. पण शेकापनं लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही जागा राष्ट्रवादीकडे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागेवर कोण उभं राहणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

एकीकडे पार्थ पवारांच्या एन्ट्रीची चर्चा रंगत असताना लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त शरद पवार निवडणूक लढवणार. यात अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नसल्याचं दस्तरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलं होतं. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार लोकसभा निवडणुका लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण घरच्यांनीच निवडणुका लढवायच्या तर कार्यकर्त्यांचं काय असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनीच त्यांच्या राजकीय एंट्रीला ब्रेक लावल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत्या.

एकीकडे पार्थ पवार यांच्या राजकारणातील एन्ट्रीच्या अशा तळ्यात-मळ्यात चर्चा सुरू असताना पार्थ यांनी मात्र राजकारणातील बड्या नेत्यांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या बैठका घेत पार्थ राजकारण पाय रोवण्याचा प्रयत्न करतायत.

पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी असलेली नाराजी, शेकाप, अजित पवार गट आणि अजित पवार यांचे भाजपात गेलेले समर्थक यांच्या साह्याने शिवसेनवला शह देता येईल हीच पार्थ पवार यांची जमेची बाजू आहे.

VIDEO : ...जेव्हा सुप्रिया सुळेंना उचलून पती सदानंद यांनी चढल्या जेजुरीच्या पायऱ्या

First published: March 4, 2019, 6:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading