शरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ

शरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर मी जिवंत वाचू शकलो नसतो - छगन भुजबळ

'मला तुरुंगात सव्वा दोन महिने 102 डिग्री इतका ताप होता. त्यामुळे मी झोपू शकत नव्हतो. मात्र, मला उपचार मिळू दिले जात नव्हते'

  • Share this:

औरंगाबाद, 21 जानेवारी : 'तुरुंगामध्ये असताना मला 102 डिग्री इतका ताप सव्वा महिना होता. मुद्दाम मला उपचार दिले नाही, जर शरद पवारांनी पत्र लिहिले नसते तर आज मी तुमच्यासमोर जिवंत नसतो' असा खळबळजनक खुलासा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. ते औरंगाबादेत बोलत होते.

बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांनी 2 वर्ष तुरुंगात काढली. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आली. आज कन्नडमध्ये राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा पार पडली. यावेळी भुजबळांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला.

मला तुरुंगात सव्वा दोन महिने 102 डिग्री इतका ताप होता. त्यामुळे मी झोपू शकत नव्हतो. मात्र, मला उपचार मिळू दिले जात नव्हते आणि तुरूंगामध्ये व्यवस्थित उपचार केले जात नव्हते. मला उपचार मुद्दाम मिळू दिले नाहीत की, हलगर्जीपणा केला हे सरकारलाच माहीत. पण शरद पवारांनी सरकारला पत्र लिहिले नसते तर मी आज तुमच्या समोर जिवंत नसतो' असा खुलासा भुजबळ यांनी केला.

'प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत नक्की येणार आहेत', असा दावाही त्यांनी केला.

भुजबळ जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे केईएम आणि बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले होते. 14 मार्च २०१८ रोजी शरद पवार यांनी फडणवीस सरकारला पत्र लिहिले होते.

"गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या तब्येतीबाबत व्यथित करणाऱ्या बातम्या कानावर येतायेत. वयाच्या 71व्या वर्षी ते गेल्या 2 वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांची तब्येत नाजूक आहे. भुजबळांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. त्यांच्या तब्येतीबाबत तुम्हीही जाणताच. त्यांना योग्य उपचार मिळावेत याची काळजी तुम्ही घ्यालच. मला हे इथे नमूद करताना अतिशय दुःख होतंय की, येत्या काही दिवसांत भुजबळांचं काही बरंवाईट झालं, तर त्याला तुमचं सरकार जबाबदार असेल', असा इशारा पवारांनी दिला होता.

===================

First published: January 21, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading