शरद पवारांच्या या विधानांमुळे राजकारणात पुन्हा सस्पेन्स

शरद पवारांच्या या विधानांमुळे राजकारणात पुन्हा सस्पेन्स

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मुरब्बी राजकारणी म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. ते कधी काय गुगली टाकतील याचा नेम नाही असं त्यांचे विरोधकही म्हणतात.

  • Share this:

सातारा, 25 डिसेंबर : एकीकडे राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत तर दुसरीकडे आघाडी करताना कुठलाही चेहरा समोर करणार नाही अशी 2 विधानं राजकारणातले मोठे नेते शरद पवार यांनी केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसबरोबर आघाडी की तिसरी आघाडी यासंदर्भात पुन्हा एकदा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मुरब्बी राजकारणी म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. ते कधी काय गुगली टाकतील याचा नेम नाही असं त्यांचे विरोधकही म्हणतात. मंगळवारी सातारा जिल्ह्यात पाटणमध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी गांधी कुटुंबीयांची स्तुती केली. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते या वेळी म्हणाले.

दुसरीकडे, बारामतीत बोलताना मात्र, 'देशात पर्यायी आघाडी न करता राज्यपातळीवर आघाडी करणार', असं ते म्हणाले. "आघाडी करताना कुठलाही नवा चेहरा समोर करणार नाही", असंही ते म्हणाले. त्यांच्या या दोन्ही विधानांमुळे लोकांनी वेगवेगळे तर्क-वितर्क काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे याबद्दल आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही पाहा - VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

दरम्यान, बारामतीत बोलताना शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असं भाकितही शरद पवार यांनी केलं. '4 राज्यात भाजपचा पराभव झाल्याने, शिवसेनेला अधिकच्या जागा मिळण्याची संधी आहे. त्यात महाराष्ट्रात भाजप युती करण्याबाबत नरमाईची भूमिका घेणार त्यामुळे यातून शिवसेनेला फायदा होणार' असल्याचंही पवारांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकांविषयी बोलताना, "आम्ही महाराष्ट्रात लोकसभेसाठी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना यांना एकत्रित आणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करू. निवडणुकांसाठी 40 जागांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत आहे. येत्या 5 ते 6 दिवसात 8 जागांबाबत प्रश्न संपुष्टात येईल", असं ते म्हणाले.

दरम्यान, या वेळी पवारांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा काढत भाजपवर टीका केली. 'देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली. तर मराठा आरक्षणाचा निर्णय फसवणुकीसारखा वाटतो. न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याबाबत शंका आहे', असं म्हणत त्यांनी सरकावर निशाणा साधला.

"आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळावं या विचाराचे आहोत. त्यामुळे धनगर समाजाला बारामतीत दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाचं काय हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं", असा थेट सवाल शरद पवार यांनी केला आहे.

हेही पाहा - VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया

First published: December 25, 2018, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading