Elec-widget

BREAKING: शरद पवार माध्यमांवर चिडले, हे आहे कारण!

BREAKING: शरद पवार माध्यमांवर चिडले, हे आहे कारण!

काही वैयक्तिक कारणासाठी ही बैठक रद्द करण्यात आली. पण त्यावर तुम्ही असा गोंधळ घालणार असाल तर मी तुम्हाला उद्यापासून भेटणार नाही असं शरद पवार चिडून म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द झाल्याचं सांगत मी बारामतीला चाललो असं अजित पवार म्हणाले. त्यावर ते मुंबईतच आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. बारामतीला निघालो हे अजित पवार चेष्टेने म्हणाले. ते मुंबईतच आहेत. उद्या सकाळी तुम्हाला भेटतील असंही शरद पवार म्हणाले आहेत. हे सगळ्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार चिडले होते.

काही वैयक्तिक कारणासाठी ही बैठक रद्द करण्यात आली. पण त्यावर तुम्ही असा गोंधळ घालणार असाल तर मी तुम्हाला उद्यापासून भेटणार नाही असं शरद पवार चिडून म्हणाले. एकीकडे असं असताना बैठक होती की नव्हती यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला. बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण साडेसातच्या सुमारास बैठक रद्द करण्यात आली. आणि उद्या पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थारोता यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतली बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. बैठक रद्द झाली असून ती पुन्हा कधी होईल हे माहीत नाही पण मी बारामतील जात असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.  ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही बिनसलं का अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

इतर बातम्या - काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द

शिवसेना पक्षाबरोबर आघाडी  सत्तास्थापन करत असताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम यात कोणते विषय असावेत यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही सगळ्यात महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. चर्चा न करताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक रद्द करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यासह काही नेते तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांसह काही काँग्रेसचे नेते सहभागी होणार होते.

Loading...

दरम्यान, सत्ता कोंडीच्या या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अखेर छुपी तोडली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही तयार होतो पण शिवसेनेनं नकार दिला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या सत्ता कोंडीवर अमित शहांचं विधान, आम्ही विश्वासघात केला नाही तर..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 08:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...