S M L

दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार?

महाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार आहे.

Updated On: Jul 17, 2018 02:22 PM IST

दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार?

नागपूर,ता.17 जुलै : महाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार असून त्यात दूधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर जाणार होते मात्र तो दौरा रद्द करून शरद पवार दिल्लीत जाणार असून सायंकाळी गडकरी-पवार भेट होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून महाराष्ट्रात दूधाच्या प्रश्नावर आंदोलन पेटलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईचं दूध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा मुंबईत असून हे आंदोलन काही दिवस चिघळलं तर मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होणार आहे. रविवारी पंढरीच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात केली होती. दुधाला लीटर मागे 5 रुपये भाव ही आमची मागणी आहे. 3 रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केलाय. फक्त दूध संकलन करणाऱ्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही असंही ते म्हणाले.

...तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही !

विधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन

शिवस्मारकाच्या उंचीवरून विरोधक आमने-सामने, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड

राज्यात काय चाललंय?

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दूध संघाने रविवारी सायंकाळपासून पासून दूध संकलन बंद केलं. प्रभात , एस आर थोरात , राजहंस , कृष्णाई , पंचमहल इत्यादी सर्वांनी दूध न पाठविण्याचा निर्णय घेत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

उस्मानाबाद मदर डेअरीचा चा टँकर आंदोलकांनी अडवला. या टँकरमध्ये साडे बारा हजार लिटर दुध आहे.

सांगली जिल्ह्यात दूध आंदोलनाला, मिरज पूर्व भागातील 100 दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्र मालक, गवळी, यांनी पाठिंबा दिलाय. हे सर्व संघ दूध संकलन बंद ठेवणार.

शिर्डी-अहमदनगर - अनेक दूध संघ आणि डेअरींचा दूध संकलन न करण्याचा निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्यांनी शिर्डीत मध्यरात्री साई मूर्तीला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाची सुरूवात केली.

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे शेतकरी संघटनेच्यावतीने दुधाचा टँकर पेटवून आंदोलन केलं.

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड सुरू केलीय. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी आतपर्यंत 25 हुन अधिक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close