शरद कळसकर सीबीआयच्या कोठडीत, आणखी स्फोटक माहिती बाहेर येणार?

शरद कळसकर सीबीआयच्या कोठडीत, आणखी स्फोटक माहिती बाहेर येणार?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातला आरोपी शरद कळसकरला न्यायालयाने 10 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.

  • Share this:

पुणे, ता. 4 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातला आरोपी शरद कळसकरला न्यायालयाने 10 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. कळसकरला या प्रकरणात अधिक माहिती असून सविस्तर तपास करण्यासाठी त्याच्या अधिक चौकशीची गरज असल्याचा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून शरद कळसकरला कोठडी सुनावली आहे. शरदनेच दाभोळकरांवर दोन गोळ्या झाडल्याचा दावाही सीबीआयने न्यायालयात केला होता. अमित देगवेकर आणि राजेश बांगेरा यांना समोरासमोर बसवून तपास करायचाय त्यासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआय च्या वकिलांची न्यायालयात केली होती.

एटीएसने ऑगस्ट महिन्यात नालासोपाऱ्यातून वैभव राऊतच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्या प्रकरणात शरद कळसकरलाही अटक केली होती. एटीएसने केलेल्या चौकशीत त्याने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागाची कबूली दिली होती. नंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतरच औरंगाबादमधून सचिन अंदूरेला पोलिनांनी अटक केली होती.

मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सीबीआयला त्याला ताबा मिळाला नव्हता. शरद आता सीबीआयच्या ताब्यात आल्याने या हत्या प्रकरणातली आणखी महत्वाची माहिती बाहेर येणार आहे. या प्रकरणात पाच वर्षानंतर जवळपास सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आता कटाचा मास्टरमाईंड कोण आहे आणि नेमकी हत्या का करण्यात आली याचा शोध सीबीआय घेत आहे.

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे,डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या याच टोळीने केल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींकडून मिळालेल्या डायऱ्यांमध्ये अनेक नामवंतांची नावं असून ते सर्व टार्गेटवर होते असा दावा पोलिसांनी केला आहे.

 

VIDEO: जोधपूरमध्ये भारतीय सैन्याच्या विमानाला भीषण अपघात

First published: September 4, 2018, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading