कळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न !

कळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न !

बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसला होता तो सचिन अंदुरे...

  • Share this:

मुंबई, 19 आॅगस्ट : डाॅक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आता अखेर तपास पूर्ण झालाय. माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी कोणी झाडली? बाईकस्वार कोण होता? या प्रश्नांनी गेली ५ वर्षे तपास यंत्रणांची झोप उडाली होती. कितीही तपास चौकशा केल्या तरीही काहीच क्लू लागत नव्हता असं असताना नालासोपारा येथे स्फोटकांसह तिघांना अटक केली आणि नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा देखील उलगडा झाला.

शरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती. तेव्हा कोणत्या वेळेस कुठे जातात? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं? या सर्वाची रेकी शरद कळसकर यानं केली होती. याच रेकीच्या आधारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी पहिल्यांदा डाॅक्टर नरेंद्र दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न फसला आणि २० आॅगस्ट २०१३ ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी  नरेंद्र दाभोलकर माॅर्निंग वाॅकला जात असताना त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसला होता तो सचिन अंदुरे... याच सचिन अंदुरे ने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले.

पुढे जाऊन त्यांनी ठरल्या प्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे या हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी? याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का ? जी शरद आणि सचिनने वापरली होती. याबद्दल तपास सुरू आहे.

दरम्यान, रात्री संचिन अंदुरेची सीबीआयने झाडाघडती घेतली. थोड्याच वेळात सचिन अंदुरेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अणदूरे या आरोपील अटक करण्यात आला आहे. सचिन अणदूरेला आई वडील नसून एक लहान भाऊ आहे. तो विवाहित असून त्याला 1 लहान मुलगी आहे. औरंगाबादेतील रोजा बाझार भागात राहात होता.

 

कोण आहे आरोपी सचिन अंदूरे

- औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अंदूरे या आरोपील अटक करण्यात आला आहे.

- सचिन अंदूरे औरंगाबादच्या राजबाजार कुंवारफल्ली भागात राहत होता.

- भाड्याच्या घरात बायको आणि लहान मुलीसोबत राहत होता.

- गेल्या 14 महिन्यांपासून तो इथे राहत होता

- सचिन अंदूरेला आई वडील नाही आहेत.

- त्याला एक छोटा भाऊ आहे. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे.

- निराला बाजार भागातील एका कपड्याच्या दुकानावर तो काम करीत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 09:19 AM IST

ताज्या बातम्या