Home /News /news /

महाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली, मोठ्या मंत्र्याने बांधले शिवबंधन

महाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली, मोठ्या मंत्र्याने बांधले शिवबंधन

नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.

    मुंबई, 11 ऑगस्ट : एकीकडे भाजपमध्ये मेगाभरतीत दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेनेत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आता अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे गडाख  यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आले होते.  यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शंकरराव गडाख आणि मिलिंद नार्वेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे विधानसभेत गडाख यांनी निवडून येताच शिवसेनेत प्रवेश करावा असा आग्रह नार्वेकर यांनी केला होता. त्यावेळी गडाख यांनीही सेनेला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर अखेर आज गडाख यांनी आपला शब्द राखत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. नगर जिल्ह्यात गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री आणि उप नेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले.  त्यामुळे  जिल्ह्यात शिवसेनेची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: शिवसेना

    पुढील बातम्या