मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

शंकराचार्यांनी राम मंदिर निर्माणासाठी कायदेशीर लढाई लढली होती. 8 दिवसांपूर्वीच शंकराचार्यांनी 99 वा वाढदिवस साजरा केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 11 सप्टेंबर : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मध्यप्रदेशातील नरसिंहपुरमधील झोतेश्वर मंदिरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 99 वर्षांचे होते. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. 3 सप्टेंबर रोजी त्यांनी आपला 99 वा वाढदिवस साजरा केला होता. ते द्वारकाच्या शारदा पीठ आणि ज्योर्तिमठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते.

शंकराचार्यांनी राम मंदिर निर्माणासाठी कायदेशीर लढाई लढली. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. स्वरूपानंद सरस्वती यांना हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू मानलं जातं होतं. शंकराचार्यांच्या शेवटच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी आणि शिष्य होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आजूबाजूच्या भागातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत.

देशाच्या चार प्रमुख पीठांमधील सामील ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचं आज रविवारी निधन झालं. त्यांनी मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगावजवळील झोतेश्वर धाममध्ये शेवटचा श्वास घेतला.

First published:

Tags: Hindu, Madhya pradesh