Home /News /news /

प्रसिद्ध गायक अजय पाठकसह पत्नी आणि मुलीची घरात हत्या, 10 वर्षाच्या मुलाला कारमध्ये जाळलं

प्रसिद्ध गायक अजय पाठकसह पत्नी आणि मुलीची घरात हत्या, 10 वर्षाच्या मुलाला कारमध्ये जाळलं

आरोपी युवक भजन गायक अजय पाठक यांच्या नजिकचा असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

    शामली (उत्तर प्रदेश), 01 जानेवारी: सगळ्यात प्रसिद्ध भजन गायक अजय पाठक (Ajay Pathak)यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामध्ये अजय पाठक, त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलीची हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक भजन गायक अजय पाठक यांच्या नजिकचा असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयित युवकास ताब्यात घेतलं आहे. तर लवकरच हत्येचा खुलासा करू असा विश्वास पोलिसांनी बोलून दाखवला आहे. पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण संकेत सापडले आहेत. त्यावरून पुढील तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये हे धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. शामलीमध्ये 2019च्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरलाच प्रसिद्ध गायक अजय त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. तीघांची हत्या धारदार शस्त्राने वार करून केली तर त्यांचाय 10 वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. तिघांची हत्या घराच्या वरच्या खोलीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर बुधवारी पोलिसांनी बेपत्ता मुलाचा अर्धवट जळालेला मृतदेह हरियाणाच्या पानीपतमधून ताब्यात घेतला आहे. त्यामुळे अजय, त्यांची पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर आरोपींनी मुलाला पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांची निर्दयीपणे हत्या एकाच कुटुंबातील चार जणांच्या निघृण हत्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय पाठक (वय 42), पत्नी स्नेहलता (वय 38), मुलगी वसुंधरा (वय 15) आणि मुलगा भागवत (10) असं कुटुंब घरात राहत होते. मंगळवारी पाठक कुटुंबातील एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास जवळच राहणारा त्यांचा भाऊ अजय यांना मोबाईलवर कॉल करीत होता पण त्यांनी फोन उचलला नाही. मुलाचे अपहरण करून केली हत्या फोन कॉलला उत्तर मिळाल्यानंतर शेजारी आणि कुटुंबीय त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा घराचा दाराचा आणि छोटा गेट उघडा होता. लोक जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा अजय पाठक, त्यांची पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांनी पाहिली. मारेक्यांनी घरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अजय पाठक यांचा मुलगा भागवत आणि त्यांची कारही बेपत्ता होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (SP) विनीत जयस्वाल, जिल्हा दंडाधिकारी (DM) अखिलेश सिंह आणि डीआयजी उपेंद्र अग्रवाल घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Up Police, Uttar pradesh news

    पुढील बातम्या