अभिषेक बच्चन म्हणाला, ‘सर्वोत्तम होण्यासाठी ओव्हरटाइम करा,’ SRK ने दिलं भन्नाट उत्तर

सध्या तो कोणत्याही सिनेमाचं चित्रीकरण करत नसला तरी प्रोडक्शन, आयपीएल आणि जाहिरातींमध्ये तो व्यग्र आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 04:42 PM IST

अभिषेक बच्चन म्हणाला, ‘सर्वोत्तम होण्यासाठी ओव्हरटाइम करा,’ SRK ने दिलं भन्नाट उत्तर

मुंबई, ०९ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान किती काम करतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही. २४ तासही त्याला कमी पडतील एवढं तो काम गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. सध्या तो कोणत्याही सिनेमाचं चित्रीकरण करत नसला तरी प्रोडक्शन आणि दुसऱ्या असाइनमेन्ट आणि जाहिरातींमध्ये तो सध्या व्यग्र आहे. याचमुळे तो प्रवासही करत आहे.याचदरम्यान, अभिषेक बच्चनने सोमवारी सकाळी मंडे मोटिव्हेशन पोस्ट शेअर केली. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं. अभिषेकने लिहिले की, ‘सर्वोत्तम होण्यासाठी तुम्हाला ओव्हरटाइम काम केलं पाहिजे.’ यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, ‘धन्यवाद अभिषेक. पण आता तू मला वेळेवर काम करण्यासाठीही मोटिव्हेट कर.’


Loading...


एका मुलाखतीदरम्यान, शाहरुखने मान्य केलं होतं की, त्याला सकाळी उठायला आवडत नाही. त्याला रात्रीचं काम करायला आवडतं. शाहरुख आणि अभिषेकने ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘हॅपी न्यू इअर’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...