#Durgotsav2018 : सासूनं दिलं विष, नवऱ्याने छळलं, शहनाज बनली तलाक पीडितांचा आधार

#Durgotsav2018 : सासूनं दिलं विष, नवऱ्याने छळलं, शहनाज बनली तलाक पीडितांचा आधार

तलाक पीडित भगिनिंसाठी शहनाज शेख आज आधारवड ठरलीय. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी शहनाजची संस्था मदत करतेय.

  • Share this:

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्वानं महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

कराड : DMLT, Diploma in Medical Laboratory Technology) चं शिक्षण घेतल्यानंतर २४ व्या वर्षी शहनाजचं BAMS डॉक्टरशी लग्न झालं. लग्नानंतर 15 दिवसांमध्येच सासरकडून पॅथॉलॉजी लॅबसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. मारहाण करणं, मानसिक त्रास देणं असे प्रकार होऊ लागले. तिनं पोलिसांमध्ये तक्रार करण्याचं धाडस केलं मात्र तक्रार घेतली गेली नाही. त्याचा राग आल्यानं सासूने लिंबू सरबतातून विष दिलं आणि तिनेच आत्महत्या केल्याचा कांगावा केला.

भांडण वाढल्यावर ईदच्या निमित्तानं तिला माहिरी पाठवलं. मात्र घ्यायला कोणीच गेलं नाही. शेवटी सासरी परत आल्यावर तिला दारातूनच हाकलून दिलं गेलं आणि काही दिवसांनीच नवऱ्यानं रजिस्टर पोस्टानं तलाकनामा पाठवून दिला.

स्वत:ची केस तिनं स्वत:च्या हिंमतीवर लढवली.

दोन वर्षं सात महिन्यानंतर जुलै २०१५ मध्ये केसचा निकाल आला- ‘ ‘शहनाज तलाकशुदा नाही’ असं न्यायालयानं जाहीर केलं. नवरा-शहनाजमध्ये पती पत्नीचे संबंध कायम आहेत आणि पत्नी या नात्यानं तिला पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.

शहनाजने गप्प न राहता स्वत: कष्ट करून केसचा निकाल पदरात पाडून घेतला. ती केस जिंकली. आणि आज अशा अनेक तलाक पीडित भगिनिंसाठी ती आधारवड ठरलीय तिच्या कार्याला संघर्षाला आमचा सलाम.

(शनिवारी - बिबट्यांच्या सुटकेसाठी धावून जाणाऱ्या धाडसी डॉक्टर, विनया जंगले.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 10:59 AM IST

ताज्या बातम्या