मुस्लीम जोडप्याच्या लग्नपत्रिकेवर राम-सीतेचा फोटो, गावकऱ्यांनी मागितला माफीनामा

मुस्लीम जोडप्याच्या लग्नपत्रिकेवर राम-सीतेचा फोटो, गावकऱ्यांनी मागितला माफीनामा

लग्नपत्रिका म्हटली की त्यावर देवी-देवतांचे फोटो आलेच. पण अशाच एका लग्नपत्रिकेवर राम आणि सीतेचा फोटो छापल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 29 एप्रिल : लग्नपत्रिका म्हटली की त्यावर देवी-देवतांचे फोटो आलेच. पण अशाच एका लग्नपत्रिकेवर राम आणि सीतेचा फोटो छापल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. शाहजहापूरच्या अल्हागंजमध्ये मुलीच्या लग्नपत्रिकेवर भगवान राम आणि सीतेचा फोटो छापल्यामुळे वडिलांना माफीनामा सादर करावा लागला.

लवकरात लवकर लग्नपत्रिकेसंदरर्भात माफीनामा सादर करावा असे आदेश इबादल अली यांना देण्यात आले आहेत. मुलीच्या लग्नपत्रिकेवर देवी-देवतांचे फोटो छापल्यामुळे त्यांच्याकडून माफीनामा मागण्यात आला आहे. माफीनामा संपूर्ण शहरासमोर सादर केल्याशिवाय आणि त्यावर मंजूरी मिळाल्याशिवाय मुलीचं लग्न होऊ देणार नसल्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! बाभळीच्या झुडपात सापडलं 2 दिवसाचं अर्भक, काट्याला अडकवली होती बाळाची नाळ

अल्हागंजच्या चिलौआ गावामध्ये इबादत अली यांची मुलगी रुखसार बानोचा निकाह 30 एप्रिला होणार होता. त्यासाठी लग्नपत्रिका छापण्यात आली. ही लग्नपत्रिका एका बाजून उर्दू तर दुसऱ्या बाजूने हिंदी भाषेमध्ये छापण्यात आली होती. आणि त्यावर राम आणि सीतेचा फोटो छापण्यात आला होता.

जसजशी ही पत्रिका लोकांपर्यंत पोहचली तसतसा हा चर्चेचा विषय झाला आहे. मुस्लीम असून पत्रिकेवर राम देवाचा फोटो कसा अशा टीका गावकऱ्यांनी केली आहे. खरंतर काहींनी अली यांच्या या कामगिरीचं कौतूक केलं. पण अनेकांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला.

अली यांच्या नातेवाईकांचा आणि गावकऱ्यांचा याला विरोध आहे. त्यामुळे जर मुलीचं लग्न होऊ द्यायचं असेल तर केलेल्या प्रकारासंबंधी माफीनामा सादर कर अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

VIDEO: अश्लील मेसेज पाठवण्याऱ्या रोमियोला तरुणीने बोरीवली स्टेशनबाहेरच धुतलं

First published: April 29, 2019, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading