शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या व्हिडिओमध्ये शाहिद दारूच्या नशेत मरायला टेकला आहे असंच वाटत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे- दारूच्या नशेत बुडालेली भूमिका साकारताना शाहिद कपूरला तुम्ही याआधीही अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल. पण यावेळी त्याने सर्वच मर्यादा ओलांडल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या शाहिद एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद दारूच्या नशेत मरायला टेकला आहे असंच वाटत आहे.

विशेष म्हणजे त्याच्या या स्थितीचं सारेच कौतुक करत आहेत. तो खऱ्या आयुष्यात दारूच्या आहारी गेला नसून त्याच्या आगामी 'कबीर सिंग' सिनेमात तो दारूड्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमातील 'बेखयाली' हे गाणं नुकतंच युट्यूबवर रिलीज झालं. या गाण्यात शाहिद एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. आतापर्यंत त्याला अशा पद्धतीने कोणत्याच सिनेमात पाहिलं गेलं नसेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

तीन मिनिटांच्या या गाण्यातला शाहिदचा अभिनय पाहून प्रत्येकजण त्याचं कौतुक करत आहेत. सचेत टंडनने हे गाणं गायलं असून यात ब्रेकअप झाल्यानंतरची मनःस्थिती शाहिदने उत्तमरित्या साकारली आहे. या गाण्यात शाहिद आपल्या प्रेयसीच्या आठवणीत दारुचे पेग रिचवताना दिसतो. या गाण्याची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे गाण्यात शाहिद आणि कियाराची दाखवलेली जबरदस्त केमिस्ट्री.

प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

2017 मध्ये आलेल्या 'अर्जुन रेड्डी' या तेलगु सिनेमाचा हा अधिकृत रिमेक आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिद एका विक्षिप्त तरुणाच्या भूमिकेत दिसत आहे. शाहिद कपूर या सिनेमात कबीर सिंग या मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका साकारत आह. तर कियारा आडवाणी त्याची प्रेयसी दाखवण्यात आली आहे. कबीर हा फार रागीट स्वभावाचा असतो. पण त्याचं प्रितीवर (कियारा आडवाणी) अतोनात प्रेम असतं. पण अचानक प्रिती त्याच्या आयुष्यातून निघून जाते.

करण जोहरच्या बेडरूममध्ये आहे या अभिनेत्याच्या बायकोचा फोटो

प्रेमभंगापासून पळण्यासाठी डॉक्टर कबीर सिंग दारुच्या आहारी जातो आणि स्वतःच्या आयुष्याची वाताहात करून घेतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहिदचे दोन वेगवेगळे लुक दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये अक्शन सीनसोबत अनेक भावनिक दृश्यही दाखवण्यात आली आहेत. काहींनी सोशल मीडियावर सिनेमात शाहिदने साकारलेल्या मद्यधुंद व्यक्तिरेखेवर टीकाही केली. मात्र भूमिकेची गरज असल्यामुळे त्याने या सर्व गोष्टी केल्या, असं शाहिदने स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading