15 जानेवारी, धुळे : जम्मू काश्मीरमध्ये शहिद झालेले लान्सनायक योगेश भदाणे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी म्हणजेच खलाणेत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झालेत. धुळे जिल्ह्यातील शहिद जवान योगेश भदाणे यांचं पार्थिव दुपारच्या सुमारास नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झालं होतं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं धुळ्याच्या खलाणे गावी नेण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जवान योगेश भदाणे शहिद झालेत.
शनिवारी सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौकीवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही जशाच तसे उत्तर दिले. मात्र या गोळीबारात लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 28 वर्षीय लान्सनायक योगेश भदाणे हे धुळ्यातील खळाणे गावातील रहिवासी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि परिवार आहे. योगेश मुरलीधर भदाणे हे बहादुर सैनिक होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shahid yogesh bhadane