Home /News /news /

शाहीन बाग गोळीबार: युवकाने सांगितलं गोळीबार करण्याचं कारण, पोलिसही हैराण

शाहीन बाग गोळीबार: युवकाने सांगितलं गोळीबार करण्याचं कारण, पोलिसही हैराण

पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले असून तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी आहे.

    नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : दिल्लीच्या शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे सीएएच्या निषेधाच्या (CAA Protests) विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले असून तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी आहे. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले की, 'या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.' पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षांचा आहे आणि तो एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही मुठभर लोकांनी आपल्याच देशातील शाहीन बागेत आंदोलन सुरू करू बाग हस्तगत केली आहे. याचा त्याला राग आला आणि त्यामुळे कपिल गुर्जरने तिथे गोळीबार केला. त्याने परिसरातून रिक्षा केली आणि तो शाहीन बागेत गेला. तिथे त्याने 2 गोळ्या झाडल्या. दुसरीकडे, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पोलिसांजवळ उभे असलेल्या व्यक्तीने दोन किंवा तीन वेळा गोळीबार केला. तो म्हणाला, 'आम्ही अचानक बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या. त्यावेळी तो 'जय श्री राम' च्या घोषणा देत होता. त्याच्याकडे सेमी ऑटोमेटिक बंदूक होती आणि त्याने दोन फेऱ्या झाडल्या. पोलीस त्याच्या मागे उभे होते. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा त्याची बंदूक जाम झाली तेव्हा तो पळून जाऊ लागला. त्याने पुन्हा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि बंदूक झाडीत टाकली. यानंतर आम्ही त्याला काही पोलिसांच्या मदतीने पकडले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जामीया विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच शाहीन बागमध्येही असाच प्रकार झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जामीया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला होता. जामीयामध्ये गोळीबार करणाऱ्या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या