मुंबई, 15 मे- तुम्हाला सर्व स्टार एका जागी कुठे पाहायचे असतील तर एकमेव ठिकाण म्हणजे पुरस्कार सोहळा. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये बॉलिवूडचे नावाजलेले कलाकार एका छताखाली येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, नवाब सैफ अली खान आणि खिलाडी अक्षय कुमार एकत्र दिसत आहेत. .त शाहरुख आणि सैफ मिळून दोघंजण अक्षयची थट्टा उडवत होते. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या या व्हिडिओत सैफ आणि शाहरुख अक्षयला स्टेजवर पाडण्याचं कारस्थान कसं करतात ते दाखवण्यात आले आहे.
डोळ्यांसमोर दोन वर्षांच्या मुलीला तडफडत मरताना पाहिलं, अभिनेत्यानं शेअर केलं दुःख
अक्षय जेव्हा स्टेजवर पडतो त्यानंतर उठून तो शाहरुखला म्हणतो की, ‘काल तुझ्या बायकोचा गौरी खानचा मला फोन आला होता.’ त्याचं हे वाक्य ऐकून शाहरुखला धक्का बसतो. यानंतर मस्करीत शाहरुख असं काही बोलून जातो की, ते ऐकून गौरीसोबत प्रेक्षकांमध्ये बसलेले सारेच हसायला लागतात.
दिशा पाटनीने केलं असं काही की लोक म्हणाले, ‘हा तर टायगरचाच परिणाम...’
यानंतर शाहरुख मस्करीत प्रत्युत्तर देताना म्हणतो की, ‘माझी बायको तर आस्तीन की सांप निकली...’ शाहरुखला अजून चिडवण्यासाठी अक्षय गौरीच्या दिशेने पाहून म्हणतो की, ‘ठीक आहे.. मी तिकडे येईन.. तुम्ही मला कधीही फोन करा..’ नक्की त्यांच्यात काय बोलणं झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा...
घटस्फोटानंतर स्वतंत्र्य आयुष्य जगत आहेत या 5 बॉलिवूड स्टार्सच्या मुली