VIDEO- जेव्हा सर्वांसमोर शाहरुख म्हणाला, ‘माझं नशीब फार फुटकं होतं जेव्हा मी ऐश्वर्यासोबत...’

VIDEO- जेव्हा सर्वांसमोर शाहरुख म्हणाला, ‘माझं नशीब फार फुटकं होतं जेव्हा मी ऐश्वर्यासोबत...’

शाहरुखचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्याचं शाहरुख सूत्रसंचालन करत होता. दरम्यान, ऐश्वर्या रायला त्याने स्टेजवर बोलावलं

  • Share this:

मुंबई, 18 मे- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसाठी लोक किती वेडे आहेत हे काही नव्याने सांगायला नको. फक्त देशातच नाही तर जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. त्याच्या अभिनयाचे जेवढे लोक दिवाने आहेत तेवढेच दिवाने त्याच्या अँकरिंगचेही आहेत. शाहरुखचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्याचं शाहरुख सूत्रसंचालन करत होता. दरम्यान, ऐश्वर्या रायला त्याने स्टेजवर बोलावलं.

शाहरुख आणि ऐश्वर्याने अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. पण शाहरुखला एका गोष्टीचं कायमच दुःख राहिलं आहे. ती गोष्ट कोणती याचा खुलासा त्याने या कार्यक्रमात केला. त्यावेळी स्टेजवर शाहरुखसोबत ऐश्वर्या रायही उपस्थित होती. ऐश्वर्याने तेव्हा लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, सुपरस्टारच्या पत्नीने दिलं जसंच्या तसं उत्तर

शाहरुखने ऐश्वर्याला अवॉर्ड दिला. पण अवॉर्ड देण्याच्याआधी बादशहा म्हणाला की, ‘माझं नशिब फार फुटकं होतं जेव्हा मी आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा जोश सिनेमात काम करत होतो. तेव्हा ऐश्वर्या माझी जुळी बहीण दाखवली होती. तेव्हा लोकांनी मला सांगितलंही की मी आणि ऐश्वर्या सारखेच दिसतोय. मी अनेकवर्ष याच विश्वासात काढली.’

टीव्ही अभिनेत्याला पोलिसांची ‘थर्ड डिग्री’, मॉलमधून थेट रुग्णालयात

एवढंच बोलून शाहरुख थांबला नाही तो पुढे म्हणाला की, ‘दुसऱ्या सिनेमात माझं सगळं काही सेट होतं. देवदास सिनेमात मीच तिला सोडलं आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा ती मला सोडून गेली होती. मोहब्बतेंमध्ये तर ती भूतच झाली होती. आता मला वाटतंय की कोणी तरी सामान्य सिनेमा तयार करा ज्यात आम्ही एकमेकांवर प्रेम करताना दिसू...’

First published: May 18, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading