जैशच्या संपर्कात पाकिस्तान; कुरेशींच्या 'त्या' उत्तरानं पाकिस्तानचा बनाव उघड

जैशच्या संपर्कात पाकिस्तान; कुरेशींच्या 'त्या' उत्तरानं पाकिस्तानचा बनाव उघड

दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची नेमकी भूमिका काय? याबद्दल आता प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 3 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची बाजू सांभाळताना पाकिस्तान पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. कारण, बीबीसीच्या पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतान कुरेशींची फेफे उडाली. त्यांना काय उत्तर देऊ हेच कळेना. त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

बीबीसीला मुलाखत देताना शाह मेहमुद कुरेशी यांनी 'जैश' सोबत पाकिस्तान संपर्कात असल्याचं सांगितलं. त्यानंतर पत्रकारानं पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'शी कुणी संपर्क साधला होता? असा सवाल केला. त्यावर मात्र शाह मेहमुद कुरेशी यांची फेफे उडाली. त्यांना काय उत्तर देऊ हेच कळेना. कुरेशी पूर्णता गोंधळून गेले. त्यामुळे दहशतवादाला आम्ही पाठिंबा देत नाहीत असा दावा करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

बीसीसीआयला आयसीसीचा दणका, पाकिस्तानबाबतच्या त्या मागणीवर दिला निर्णय

'जैश'नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पत्रकाराच्या या प्रश्नाला मात्र कुरेशी यांनी त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असं सोयीस्कर उत्तर दिलं.

तर, हल्ल्यानंतर 'जैश'शी कुणी संपर्क केला का? या प्रश्नावर मात्र त्यांनी नाही असं उत्तर दिलं.

शाह मेहमुद कुरेशी यांच्या उत्तरामुळे आता पाकिस्तानभोवती संशयाचे ढग आता दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. शिवाय, दहशतवादाबद्दल पाकिस्तानची नेमकी भूमिका काय? असा सवाल देखील आता निर्माण होत आहे.

भारताकडे चर्चेचा प्रस्ताव

मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताला उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं भारताकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, भारतानं मात्र दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी समज पाकिस्तानला दिली आहे.

VIDEO: मुंबईत भाजपची विजय संकल्प रॅली; मुख्यमंत्र्यांनी 'असं' केलं शक्तीप्रदर्शन

First published: March 3, 2019, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading