VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

जर आम्ही आमच्या शरीराचा धंदा करू नये असं वाटतंय तर समाजाने, सरकारने आम्हाला व्यवस्थितीत काम द्यावे.

  • Share this:

नाशिक, 01 आॅगस्ट : आम्हाला आमचा धंदा करू द्या, आम्ही रस्त्यावर उभं राहून आमचं पोट भरतो, कुणी चलं म्हटलं तर आम्ही जातो कुणावर जबरदस्ती करत नाही. साधा चहा प्यायला गेलं तर दुकानदार हाकलून लावतात..आम्ही धंदा करतो म्हणून आमची चूक आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थितीत करत नाशिकमध्ये सेक्स वर्कर महिलांनी पंचवटी भागातील भद्रकाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

नाशिकच्या पंचवटी भागात गेल्या महिन्याभरात सेक्स वर्कर महिलांनावर पोलिसांनी कारवाई केली. स्थानिकांनी आणि दुकानदारांनी या सेक्स वर्कर महिलांकडून त्रास होत असल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईमुळे सेक्स वर्कर महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. पण पोटाचा प्रश्न या महिलांना चैन पडू देत नव्हता. अखेर आम्हाला धंदा करू द्यावा नाहीतर पूनर्वसन करावं या मागणीसाठी थेट पोलीस ठाण्यावर या महिलांनी मोर्चा काढला. या मोर्च्यात लहान मुलांना घेऊन मोठ्या संख्येनं महिला मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या.

न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधींनी या महिलांचा बाजू जाणून घेतली असता त्यांनी आपल्यासोबत होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचून दाखवला. आम्हाला आमचा धंदा करू द्यावा, आम्ही रस्त्यावर उभं राहून आमचं पोट भरतो, कुणी चलं म्हटलं तर आम्ही जातो कुणावर जबरदस्ती करत नाही. जर आमच्याकडून चूक असेल तर नक्की आम्हाला बोला पण कुणी दगडं मारतं, रिक्षावाले, दुकानदार आम्हाला हुसकावून लावतात. साधा चहा प्यायला गेलं तर दुकानदार हाकलून लावतात..आम्ही धंदा करतो म्हणून आमची चूक आहे का ?, आम्ही जर नसलो तर कसं होणार ?, एवढी बलात्कार-छेडछाडीचे प्रकार होतात पोलीस का कारवाई करत नाही...आमच्यावरच कारवाई कशाला...आमची लेकरं कशी जगतील अशी व्यथा एका सेक्स वर्कर महिलेनं मांडली.

या मोर्च्यात एक सेक्स वर्कर आई मुलासोबत सहभागी झाली होती.  आम्ही आमचा धंदा करतोय...लेकरांना उपाशी तपाशी सोडून रस्त्यावर उभं राहतो...पण आमच्याच विरोधात तक्रारी दाखल करताय...जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा...आम्ही आमची चूक सुधारू...आमच्या लेकरांसाठी तरी आम्हाला धंदा करू द्या नाहीतर सरकारी नोकरी द्या अशी मागणी या महिलेनं केली.

या मोर्च्यातील आणखी एका महिलेनं समोर येऊन विनंती केली तिची विनंती समाजाला अंर्तमुख करणारी अशीच आहे. आम्हीही याच समाजातून आलोय, निदान आमच्या लेकरांसाठी तरी आम्हाला धंदा करू द्यावा...जर आम्ही आमच्या शरीराचा धंदा करू नये असं वाटतंय तर समाजाने, सरकारने आम्हाला व्यवस्थितीत काम द्यावे..असं झालं तर आम्ही आमच्या लेकरांना घेऊन कुठेही निघून जावू असं या महिलेनं सांगितलं.

पोलिसांनी या महिलांचे निवेदन स्विकारले. पण यावर काही ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी आमदार,खासदार यांनाही भेटणार असल्याचं या सेक्स वर्कर महिलांनी सांगितलं.

हेही वाचा

दलित संघटनांचा विजय,'अॅट्रॉसिटी'बद्दल केंद्राचा मोठा निर्णय

VIDEO : बस चालव असताना 'तो' प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता

पैसे नाहीयेत, तरीही बुक करू शकता ऑनलाइन तिकीट

SBI चा इशारा! बँक अकाऊंटमधून होत आहे नव्या पद्धतीने चोरी

 

First published: August 1, 2018, 6:33 PM IST

ताज्या बातम्या