वाराणसी, 25 जुलै : देशात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक सेक्स रॅकेटचा भयानक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. पूर्वांचलमध्ये गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. आरोपींची थेट मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवणाऱ्या आरोपीची मोठ्या प्रमाणात मालमत्ता पोलिसांकडून जप्त केली गेली आहे. 9 फेब्रुवारी रोजी वाराणसी इथल्या पांडेयपूर इथे सेक्स रॅकेट पकडण्यात आलं होतं. यामध्ये समोर आलेला आरोपी संजय सिंह याची मोठ्या प्रमाणात पोलिसांनी संपत्ती जप्त केली आहे. ज्यात संजय नगर कॉलनीतील सुमारे 80 लाख रुपयांच्या घराचा समावेश आहे. गुंड कायद्यान्वये संजय सिंगचं तीन मजली घर, स्कॉर्पिओ आणि दुचाकी जप्त केली.
आता पाकिस्तानही बनवणार जीवघेणा व्हायरस, चीनशी झाला गुप्त करार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची एकूण मालमत्ता एक कोटी 37 लाख 63 हजार असल्याचं सांगितलं जातं आहे. जिल्हा कारागृहात बंद असलेला संजय सिंह हा चौबेपूर पोलीस स्टेशन परिसरातील धौरहराचा रहिवासी आहे. संजय सिंगच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा एका युवतीने त्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी संजय सिंह यांच्यासह 16 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यात होऊ शकतो विकेंड लॉकडाऊन, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली माहिती
5 ऑगस्टला राज्यात मंदिरं उघडण्यासाठी भाजप मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र
खरंतर, गेल्या पंधरवड्यापासून पोलीस गुन्हेगारांना आर्थिकरित्या दुर्बल करण्यासाठी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करत आहेत. डीएम कौशल राज शर्मा यांच्या आदेशानुसार, गँगस्टर कायद्यांतर्गत आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गँगचा शार्प शूटर आणि झुन्ना पंडित, विनोद कुमार, राजकुमार मौर्य, अजय चौरसिया अशा अनेक आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 1.25 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sex racket, Uttar pardesh