फार्म हाऊसलाच बनवला सेक्स रॅकेटचा मोठा अड्डा, 3 तरुणींसह 12 जणांना अटक

फार्म हाऊसलाच बनवला सेक्स रॅकेटचा मोठा अड्डा, 3 तरुणींसह 12 जणांना अटक

पकडलेल्या तीन तरुणी महिला पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

आगरा (उत्तर प्रदेश), 25 जुलै : पोलिसांनी फॉर्म हाऊसवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आग्राच्या सिकंदरा भागात फार्म हाऊस चालक व तीन महिलांसह 12 जणांना अटक करण्यात आली. पकडलेल्या तीन तरुणी महिला पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध अनैतिक शरीर व्यापार कायद्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्म हाऊसमध्ये देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच एएसपी सौरभ दीक्षित यांनी पोलीस पथकासह शुक्रवारी सायंकाळी कमला फार्म हाऊसवर छापा टाकला. पोलिसांच्या छापामुळे मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. सगळीकडे शोध घेत असताना, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तरूण आणि पुरुष आपत्तिजनक अवस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 12 जणांना अटक केली.

बिल ऐकून कोरोना रुग्ण गेला पळून, मुंबईत सगळ्यांना बाधित करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, हे फार्म हाऊस औद्योगिक क्षेत्रात आहे. जिस्मफरोशीचा हा एक अड्डा बनला होता. इथं पश्चिम बंगालमधील महिलांना थांबवून ग्राहकांना सेवा दिली जात होती. रोज इथे अनेकांचे व्यवहार होत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

SEX रॅकेट चालवणाऱ्यावर सगळ्यात मोठी कारवाई, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

तीन मुलींसह 12 जणांना पोलिसांनी केली अटक

एसएसपी बबलू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फार्म हाऊस अशोक राणा नावाच्या व्यक्तीचा आहे. सचिन, परम, विष्णु आणि विशाल गोयलने हा अशोक राणाकडून भाड्याने घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी छापा घातल्यानंतर चारही पार्टनरला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणी कसून चौकशी करत असून आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 25, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या