गाझियाबाद, 20 जून : शुक्रवारी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्ली-एनसीआरमधील तरुणांना अश्लिल मेसेजमध्ये गुंतवूण लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतल्या मुली मुलांशी गोड बोलायच्या आणि नंतर बनावट व्हिडिओ बनवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत लाखो रुपयांची फसवणूक करायच्या. पण, या टोळीच्या एका चुकीमुळे सध्या संपूर्ण टोळी तुरुंगात आहे. गाझियाबादच्या विजय नगर पोलिसांनी या टोळीत काम करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरुषांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
व्हिडिओ कॉल करून ग्राहक बनवायची आणि नंतर पैशांची लूट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने दिल्लीतल्या आयटी व्यावसायिकांना टार्गेट केलं. या व्यावसायिकांकडून या टोळीने एका झटक्यात 2.10 लाख रुपये वसूल केले. पण एका मुलाने जास्त पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे एका मुलीने विजय नगर पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या मुलावर बलात्काराचा आरोप केला. पण पोलिसांच्या कसून चौकशीनंतर तरुणीने खरं सांगितलं आणि टोळीचा पर्दाफाश झाला.
सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!
खरंतर, दिल्ली-एनसीआरमध्ये ब्लॅकमेलिंग करणाऱ्या अशा अनेक टोळ्या आहेत. असाच, दिल्ली इथला रहिवासी रोहित कुकरेजा हा यापूर्वीही या टोळीच्या संपर्कात आला होता. रोहितने टोळीतील एका महिलेने आयटी क्षेत्रात मोठी नोकरी केल्याचा दावा केला. एके दिवशी त्या बाईने रात्री रोहितला तिच्या घरी लपून बोलावलं. रोहित जेव्हा महिलेच्या घरी भेटायला गेला, तेव्हा त्यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला आणि त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
युवतीने वडिलांचं गुप्तांग कापून केलं ठार, म्हणाली 'रात्री शांतपणे लागली झोप'
इज्जतीसाठी दिले तब्बल 2.10 लाख रुपये
समाजात आपला अपमान होऊ नये म्हणून रोहित कुकरेजाने 2.10 लाख रुपये दिले. पण टोळीतल्या लोकांनी आणखी पैशांची मागणील केली. पण जेव्हा रोहितने पैसे देण्यासाठी नकार दिला तेव्हा मात्र परिस्थिती बिघडली. हे प्रकरण पोलिसांत गेलं आणि कसून चौकशीनंतर सगळा खुलासा झाला. यानंतर, पोलिसांनी आरोप करणार्या महिलेसह आणखी तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे.
भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे चीन, या 'Email Id' पासून सावधान
संपादन - रेणुका धायबर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.