मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सात मुलींच्या खांद्यावर आईची अंत्ययात्रा, हा फोटो खूप काही सांगून जातो!

सात मुलींच्या खांद्यावर आईची अंत्ययात्रा, हा फोटो खूप काही सांगून जातो!

या फोटोमागची कहानी वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी...

या फोटोमागची कहानी वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी...

या फोटोमागची कहानी वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी...

जळगाव, 21 ऑगस्ट : हल्लीची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या भारताची परंपरा आणि संस्कृती जपत आताच्या महिला घराबाहेर राहून कामदेखील करतात. चूल आणि मुल या संकल्पनेतून बाहेर येत आता महिला यशाच्या उंच शिखरावर आहेत. पण यात जुन्या परंपरा आणि रूढींना फाटा देत सात मुलींनीच आपल्या आईला खांदा देत अग्निडाग दिल्याची बातमी समोर आली आहे.

एरंडोल तालुक्यातील तळई गावात कमलाबाई इच्छाराम महाजन (वय 70) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्याप्रसंगी त्यांच्या सात मुलींनी आईच्या प्रेताला स्वतः खांदा दिला व अग्नी डागही दिला. त्यांच्या या कर्तव्यामुळे सर्व स्तरातून या मुलींचं कौतूक होत आहे. प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि त्यापुढे कुठल्याही परंपरा नसतात असं या मुलींनी यातून दाखवून दिलं आहे.

कुटुंबाच्या हट्टामुळे 2 दिवस तरुणाचा मृतदेह पडून, लघवी करण्यावरून केला होता खून

एरंडोल तालुक्यातील तळई या गावी इच्छाराम महाजन हे शेती व्यवसाय व विहीर बांधणीचे काम करुन आपला परिवार चालवत होते. त्यांना सात मुली झाल्या पण मुलगा मात्र झाला नाही. त्यामुळे सातही मुलींना इच्छाराम महाजन आणि कमलाबाई महाजन यांनी काबाड कष्ट करून मोठं केलं. सातही मुलींचे चांगल्या घरात लग्न करुन दिलं. काल 20 ऑगस्ट 2020 रोजी कमलाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अभिनेता दिलीप कुमार यांचे धाकटे भाऊ असलम खान यांचे कोरोनामुळे निधन

यावेळी कठीण परिस्थिती सातही मुली एकत्र आल्या. रंजनाबाई माळी, सुशिला पाटील, अंजना महाजन, अश्विनी महाजन, आशा महाजन, वैशाली महाजन, संगिता महाजन अशी सात बहिणींनी नावं आहे. यावेळी दुःखात खचून न जाता जावई तुकाराम महाजन, वसंत पाटील, चंद्रकांत महाजन, अविनाश सुर्यवंशी, नटराज महाजन, महेंद्र महाजन यांच्या पुढाकाराने व गावातील सरपंच प्रकाश महाजन, समाधान पाटील, देविदास महाजन, इच्छाराम महाजन यांनी मुलींना अग्निडाग व खांदा देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर मनसे नेता भडकले, ट्वीट करून म्हणाले...

जुन्या चालिरितींना न जुमानता सहा मुलींनी आईच्या प्रेताला खांदा दिला तर लहान मुलगी संगिता महाजन हिने अग्निडाग दिला. याकृती बद्दल गावातील सर्व लोकांनी व नातेवाईकांनी मुलींचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. या सात मुलींमधील पाच नंबरची मुलगी पुणे येथे एल.आय.सी.ऑफिसमध्ये नोकरी करते.

First published:
top videos