देशातल्या या राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल

देशातल्या या राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल

टॅक्स कमी करणारी राज्यं आहेत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपरा, गुजरात आणि मध्यप्रदेश. ही सर्व पाचही राज्य ही भाजप शासीत असल्याने भाजपने काँग्रेसवर निशाना साधलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 4 ऑक्टोबर : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंधनाच्या टॅक्समध्ये अडीच रूपयांची कपात केल्यानं नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. आता राज्यांनीही आपल्या करांमध्ये कपात करावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्याल प्रतिसाद देत काही राज्यांनीही केंद्र सरकारप्रमाणच अडीच रूपयांनी टॅक्स कमी केला. त्यामुळं त्या राज्यांमध्येही आता पाच रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. टॅक्स कमी करणारी राज्यं आहेत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपरा, गुजरात आणि मध्यप्रदेश. ही सर्व पाचही राज्य ही भाजप शासीत असल्याने भाजपने काँग्रेसवर निशाना साधलाय.

 

मुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट

मध्यरात्रीपासून या किंमती स्वस्त होणार असल्यानं नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालाय. गेल्या महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतेय. त्यामुळं पेट्रोलनेतर नव्वदी पार केली होती. त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांवरही प्रचंड दबाव वाढत होता. त्यातच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने त्याचाही दबाव सरकारवर होता. त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेणं भाग पडलं.

काय म्हणाले अरूण जेटली

इंधन दरवाढीच्या भडक्यानंतर अखेर केंद्र सरकारला शुक्रवारी जाग आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलीये. केंद्राने सर्व राज्यांनाही व्हॅटमध्येही अडीच रूपयांची कपात करण्याची सूचना केली होती.

महाराष्ट्रात पेट्रोल पाच रूपयांनी स्वस्त! राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरीकडे वाटचाल केलीये. त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दररोज वाढ होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांची पत्रकार परिषद घेऊन इंधन दरवाढीवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला.

पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार,अरुण जेटलींची घोषणा

पेट्रोलियम कंपन्यांकडून 1 रुपया तर केंद्र सरकारने दीड रुपयांची कपात केलीये. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात झाल्याची घोषणा जेटली यांनी केली.

या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर 10.50 हजार कोटींचा भार पडणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

 

 

First published: October 4, 2018, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading