धक्कादायक! बेपत्ता असलेल्या नाट्य वितरक प्रफुल्ल महाजनांचा मृतदेह तलावात सापडला

धक्कादायक! बेपत्ता असलेल्या नाट्य वितरक प्रफुल्ल महाजनांचा मृतदेह तलावात सापडला

कोल्हापूरमधील ज्येष्ठ नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांचा मृतदेह सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाजन हे बेपत्ता होते. सोमवारी पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 07 जानेवारी : कोल्हापूरमधील ज्येष्ठ नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांचा मृतदेह सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाजन हे बेपत्ता होते. सोमवारी पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला आहे.

महाजन हे गेल्या रविवारपासून बेपत्ता होते. त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

कोल्हारपूरमधील कोटीतीर्थ तलावात त्यांचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रफुल्ल महाजन यांची हत्या करण्यात आली की ही आत्महत्या होती याने परिसरात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्रफुल्ल यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे प्रफुल्ल यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा आता पोलीस तपास करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस आता संबंधीतांची चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

जेव्हा रत्नागिरीत उतरलं 'राफेल' विमान; पहा VIDEO

First published: January 7, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading