पंढरपूर, 17 ऑगस्ट : कोरोनाचा कहर वाढत असताना सर्वसामान्यांसह राज्यातील अनेक दिग्गजांना कोरोनाने विळखा घातला आहे. अशात सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राजकारणातील संत म्हणजे सुधाकरपंत अशी ओळख असणारे परिचारक सध्या पुणे इथल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकरपंत यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशात परिचारक कुटुंबातील इतर सदस्यदेखील कोरोनाग्रस्त आहे. त्यामुळे सुधाकपंत यांचे नातू प्रितीश परिचारक यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन सोशल मीडिययावरून केलं आहे.
सुधाकरपंत यांना कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांच्या प्रकृती चिंताग्रस्त आहे. ते आजारी असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहे. तर आजोबांसाठी प्रार्थना करा असं आवाहनही प्रितीश पारिचारक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन
प्रितीश यांनी काय लिहिलं पोस्टमध्ये?
'गेल्या काही दिवसांपासुन पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणू ची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगिकरण वॉर्डस मध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.
Weather Alert: पुढचे 48 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिला इशारा
आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोना ची लढाई कठीण होत आहे. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्ती वर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.
सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुलांवर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालंं पद
वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Lockdown