मनसेतून आलेले नगरसेवक आमच्यासोबतच, शिवसेनेचा दावा

मनसेतून आलेले नगरसेवक आमच्यासोबतच, शिवसेनेचा दावा

बीएमसीतील मनसेचा नगरसेवक वापसीचा दावा शिवसेनेनं खोडून काढलाय. शिवसेनेनं संबंधीत नगरसेवकांच्या सह्याचं प्रसिद्धीपत्रकच काढलंय. या परिपत्रकांवर मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. आज दुपारी मनसेकडून सेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर शिवसेनेकडून हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : बीएमसीतील मनसेचा नगरसेवक वापसीचा दावा शिवसेनेनं खोडून काढलाय. शिवसेनेनं संबंधीत नगरसेवकांच्या सह्याचं प्रसिद्धीपत्रकच काढलंय. या परिपत्रकांवर मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. आज दुपारी मनसेकडून सेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर शिवसेनेकडून हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय.

मनसेतून शिवसेनेत आलेले सहाही नगरसेवक शिवसेनेतच असून त्यापैकी एकही नगरसेवक मनसेच्या संपर्कात नाही, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असंही या शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सेना आणि मनसेतल्या या दावा- प्रतिदाव्यांवरून बीएमसीतील मनसेच्या बंडखोर नगरसेवकांचा नेमका कोणाला पाठिंबा आहे. हेच समजेनासं झालंय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading