उद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण?

उद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तेलुगू देसमच्या खासदारांना भेट नाकारली आहे. पावसाळी अधिवेशनात तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकार विरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी करत असून त्यासाठी त्यांनी शिवसेनेची मदत पाहिजे होती.

  • Share this:

मुंबई,ता. 15 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तेलुगू देसमच्या खासदारांना भेट नाकारली आहे. पावसाळी अधिवेशनात तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकार विरूद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी करत असून त्यासाठी त्यांनी शिवसेनेची मदत पाहिजे होती. तेलुगू देसम सध्या या प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप विरोधातल्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांना पत्रही लिहून पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं आहे. शिवसेना केंद्र सरकारमध्ये सहभागी असला तरी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत असते त्यामुळं तेलुगू देसमने शिवसेनेची मदत मागितली आहे.शिवसेना सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असली तरी उघडपणे विरोधीपक्षांच्या गटात सहभागी होण्याचं नाकारलं आहे. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर महाघाडीच्या हालचाली सुरू असून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पंश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे विविध पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभात सर्व विरोधीपक्ष एकत्र आले होते. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची तेलुगू देसमची मागणी आहे आणि त्याच मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबाही काढला होता. आंध्रप्रदेशात यावर्षीच्या शेवटी निवडणूका होणार असून त्या निवडणूकीत विशेष दर्जाची मागणी हा भावनिक मुद्दा करण्याची देलुगू देसमची योजना आहे. मात्र सीमावर्ती आणि पूर्वोत्तरेतली राज्य सोडली तर इतर राज्यांना असा दर्जा देता येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आणि दर्जा देण्यास नकार दिला.

हेही वाचा...

मुंबईला उद्या दूधपुरवढा नाही? पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स

‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, शव कटरनं कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न

ट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं?

First published: July 15, 2018, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading