गुजरात दौऱ्यात तरुणीने सुरक्षाकडं तोडून राहुल गांधींसोबत सेल्फी घेतली !

गुजरात दौऱ्यात तरुणीने सुरक्षाकडं तोडून राहुल गांधींसोबत सेल्फी घेतली !

गुजरात विधानसभा काँग्रेस जिंकणार की नाही माहित नाही, पण या निवडणुकीने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रतिमा मात्र, नक्कीच उंचावताना दिसतेय. राहुल गांधींच्या रोड शोलाही तरूणाईची प्रचंड गर्दी होतेय. आज भरूचमध्ये तर एका तरूणींने राहुल गांधींचा रोड शो अडवून त्यांच्यासोबत एक खास 'स्मायसिंग सेल्फी' घेतली.

  • Share this:

भरूच, 01 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा काँग्रेस जिंकणार की नाही माहित नाही, पण या निवडणुकीने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रतिमा मात्र, नक्कीच उंचावताना दिसतेय. राहुल गांधींच्या रोड शोलाही तरूणाईची प्रचंड गर्दी होतेय. आज भरूचमध्ये तर एका तरूणींने राहुल गांधींचा रोड शो अडवून त्यांच्यासोबत एक खास 'स्मायसिंग सेल्फी' घेतली. विशेष म्हणजे त्यासाठी तिने एसपीजीचं सुरक्षाकडंही तोडलं. राहुल गांधींनी अगदी हसतमुखाने तिच्यासोबत सेल्फी दिला. एवढंच नाहीतर तिला गाडीवरून उतरताना स्वतः हात देऊन मदतही केली. उपस्थितांसाठी हा प्रसंग निश्चितच आश्चर्यजनक असाच होता.

 

गुजरात दौऱ्यादरम्यान, भाषणांमधूनही राहुल गांधी मस्त चुटकुले ऐकवून प्रेक्षकांना खिळवून ठेऊ लागलेत. एकूणच गुजरात विधानसभा राहुल गांधींची प्रतिमा उंचावण्यासाठी निश्चितच फलदायी ठरताना दिसतेय. विशेषतः तरुणाईमध्ये राहुल गांधींची क्रेज दिवसेंदिवस वाढतच चाललीय. मोदींसाठी निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण आजवर सेल्फीसाठी नरेंद्र मोदींचीच चर्चा व्हायची. लोकंही त्यांच्यासोबत पंतप्रधानांसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडताना दिसायचे आता मात्र, तीच सेल्फीक्रेज राहुल गांधींच्या बाबतीतही अनुभवायला मिळतेय. राहुल गांधींचा सलग तिसरा गुजरात दौरा आहे.

गंम्मत म्हणजे हेच राहुल गांधी कधीकाळी सेल्फीप्रेमावरून मोदींना टीकेचं लक्षं करायचे, नाही म्हटलं आम्ही आपली फक्त आठवण करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 09:02 PM IST

ताज्या बातम्या