'सेल्फी'घाताचे आणखी किती बळी ?, 4 महिन्यात 10 दुर्घटना, 25 ठार

'सेल्फी'घाताचे आणखी किती बळी ?, 4 महिन्यात 10 दुर्घटना, 25 ठार

गेल्या 6 महिन्यात अशा प्रकारच्या 8 ते 10 दुर्घटना घडल्या असून त्यात किमान 20 ते 25 जणांचा बळी गेलाय.

  • Share this:

 

मुंबई, 10 जुलै: नागपूरच्या वेणा जलाशयात फेसबुक लाईव्हच्या नादात 8 तरुणांना जलसमाधी मिळालीय. पण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने जीव गमवावा लागल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. गेल्या 6 महिन्यात अशा प्रकारच्या 8 ते 10 दुर्घटना घडल्या असून त्यात किमान 20 ते 25 जणांचा बळी गेलाय. पाहुयात गेल्या 4 महिन्यातील 'सेल्फी'घाताच्या घटनांचा धावता आढावा....

'सेल्फी'घाताचे बळी

1 फेब्रुवारी 2016

सेल्फीच्या नादात मुंबईत दोन तरुणींना जीव गमवावा लागला

13 जून 2016

सेल्फी काढताना मुरुडमधल्या दरीत पडून तरुणाचा मृत्यू

4 नोव्हेंबर 2016

नाहूर-कांजूर परिसरातील रेल्वे यार्डात खेळताना सेल्फीच्या प्रयत्नात ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्यानं मुलाचा मृत्यू

1 मे 2017

इंदापूर तालुक्यातल्या उजनी बॅक वॉटर परिसरात सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातले 4 डॉक्टरांवर मृत्यू

4 मे 2017

मुंबईच्या वांद्रे परिसरातील बॅण्डस्टँड इथं सेल्फीची हौस तरुणीच्या जीवावर बेतली

30 जून 2017

मरिन ड्राईव्हवर मित्रांसोबत गेलेल्या तरुणीचा सेल्फीच्या नादात समुद्रात बुडून मृत्यू

4 जुलै 2017

धुळ्याच्या लळींगमधील धबधब्यात सेल्फीमुळे तरुणाचा मृत्यू

9 जुलै 2017 

नागपूरच्या वेणा जलाशयात फेसबूक लाईव्हच्या नादात 8 तरुणांना जलसमाधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 04:17 PM IST

ताज्या बातम्या