विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार; CCTVमुळे पकडला गेला चौकीदार

राजधानी दिल्लीतील एका नामवंत कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 03:10 PM IST

विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार; CCTVमुळे पकडला गेला चौकीदार

दिल्ली, 22 मे : देशात महिला सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण दिल्ली विद्यापीठाच्या एका नामवंत कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सुरक्षा रक्षकानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जुनी असून सीसीव्हीमुळे आरोपी गार्डला पकडण्यात यश आलं आहे. विद्यार्थिनीसोबत झालेल्या बलात्काकाराच्या घटनेनं कॉलेजमध्ये सुरक्षेचे केले जाणारे दावे फोल ठरताना दिसत आहेत. पीडित विद्यार्थिनी ही कॉलेजवळच आपल्या कुटुंबासोबत राहते. तर, आरोपी राजकुमार हा कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

कशी घडली घटना

पीडित विद्यार्थिनीनं दिलेल्या माहितीवरून घटना घडली त्या दिवशी सुरक्षा रक्षकानं विद्यार्थिनीला गुंगी येणार पेय पाजलं होतं. त्यानंतर तिला शुद्ध राहिली नाही. ज्यावेळी विद्यार्थिनी शुद्धीत आली तेव्हा तिचे कपडे अस्तव्यस्त पसरलेले होते. तिला चालणं देखील अवघड होऊन बसलं होतं. त्यानंतर देखील पीडित एका गुरूद्वारामध्ये पोहोचली.


संपत्तीसाठी 22 वर्षाच्या पोरानं केली बापाची हत्या; शरीराचे केले तुकडे - तुकडे

Loading...

पीडित विद्यार्थिनीची परिस्थिती पाहता लोकांनी तिला रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांना देखील याबद्दल कळवण्यात आलं. पीडित विद्यार्थिनीनं दिलेल्या माहितीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, साऱ्या घटनेच्या चौकशीदरम्यान कॉलेजची सीसीटीव्ही तपासल्यानंतर सुरक्षा रक्षक पीडित विद्यार्थिनीसोबत जाताना दिसला. यानंतर वेळ न दवडता पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसी इंगा दाखवताच आरोपीनं आपला गुन्हा कबुल केला. पण, कॉलेज प्रशासनानं यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

बलात्काराच्या घटनेनं हादरला देश

मागील 8 दिवसांमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरून गेला आहे. जम्मू आणि अलवरमध्ये देखील गँगरेपच्या घटना यापूर्वी समोर आलेल्या आहेत.


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...