ATM केंद्रावर ड्युटी करत अभ्यास; प्रेरणादायी वॉचमनचा फोटो व्हायरल

ATM केंद्रावर ड्युटी करत अभ्यास; प्रेरणादायी वॉचमनचा फोटो व्हायरल

या फोटोत एटीएम केंद्रावरचा सिक्युरिटी गार्ड (Security Guard)त्याची ड्युटीकरता करता तिथे बसून अभ्यास करत असताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई 14 एप्रिल: पूर्वीच्याकाळच्या मोठ्या नेत्यांच्या बालपणाबद्दलच्या अनेक प्रेरक कथा आपण ऐकलेल्या असतात. त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात कसा अभ्यास केला किंवा प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात केली हे वाचून/ऐकून आपल्यालाही प्रेरणा मिळते. आजच्या काळात शिक्षण घेणं त्या काळच्या तुलनेत सोपं झालं असलं,तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. अनेकांच्या शिक्षणाच्या वाटेवर अडचणींचे काटेअसतात. त्यातून काही जण संघर्ष करून दमतात आणि एके दिवशी वाट सोडून देतात.काही जण मात्र कितीही संघर्ष करावा लागला,कितीही दमछाक झाली,तरी थांबतनाहीत,वाट सोडत नाहीत आणि उद्दिष्टाकडे वाटचाल करतात. याचंच उदाहरण दिसत असलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral)झाला आहे.

या फोटोत एटीएम केंद्रावरचा सिक्युरिटी गार्ड (Security Guard)त्याची ड्युटीकरता करता तिथे बसून अभ्यास करत असताना दिसत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरन(Awanish Sharan)यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. दुष्यंतकुमारयांच्या हिंदी कवितेच्या ओळी शरन यांनी या फोटोसोबत लिहिल्या आहेत.'होकहीं भी आग,लेकिन आग जलनी चाहिए'असं त्यांनी फोटोसोबत लिहिलं आहे. हाफोटोतल्या गार्डचं नाव किंवा ठिकाण याबद्दलची माहिती मात्र फोटोसोबतदेण्यात आलेली नाही.

शरन हे2009च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे आयएएसअधिकारी आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करताच तो ट्विटरवर लगेच व्हायरल झाला.सहा एप्रिल रोजी शेअर करण्यात आलेल्या या फोटोला आतापर्यंत8हजार800जणांनी लाइक केलं असून, 112जणांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.832जणांनीहा फोटो रिट्विट केला आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट म्हणून अशाचप्रकारच्या अभावग्रस्त व्यक्तींच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची (Struggle for education)उदाहरणं दिसत असलेले फोटो पोस्ट केले आहेत. अनेकांनीफोटोतल्या या सिक्युरिटी गार्डच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.

शिक्षणाचामूलभूत हक्क (Right to Education)मिळवण्यासाठीही नागरिकांना किती कष्टकरावे लागतात,याचं हे एक उदाहरण. यापूर्वीही अशी काही उदाहरणं इंटरनेटवरव्हायरल झाली होती.2019मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या सिक्युरिटीगार्डने ड्युटीवर असताना अभ्यास करून कोर्सची प्रवेश परीक्षा दिली होती आणित्यात तो यशस्वीही झाला होता.

त्या तरुणाचं नाव राजमल मीना.2004मध्ये राजस्थानमधल्या करौली गावातल्या या तरुणाला पदवीचं शिक्षणअर्ध्यावर सोडावं लागलं. कारण कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळेत्याला रोजंदारीवर काम करण्याशिवाय पर्याय नव्हता.2003मध्येच त्याचं लग्नझालं होतं. शिवाय तो पाच भावंडांपैकी सर्वांत मोठा होता. त्यामुळे कुटुंबचालवण्यासाठी वडिलांसोबत तो मोलमजुरीच्या कामावर रुजू झाला. त्याचंशिक्षणाचं स्वप्न धुळीला मिळाल्यात जमा होतं;पण2014मध्ये तो नवीदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)सिक्युरिटी गार्ड म्हणूननोकरीला लागला. गार्ड म्हणून काम करता करता त्याने अभ्यास केला आणि पाचवर्षांनी तो या नामवंत विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊनविद्यापीठाचा विद्यार्थीही झाला.

'मला माझ्या शिक्षणाच्यास्वप्नाचा पुनर्विचार करावा लागेल,अशी ती वेळ होती. तेव्हा माझे वडीलएकटेच संघर्ष करत होते. म्हणून मी त्यांच्यासोबत काम करून पैसे कमावूलागलो.2004मध्ये शिक्षणाला पूर्णविराम लागला असला,तरी आता मला पुन्हाशिक्षण घेता येईल,'अशी प्रतिक्रिया त्याने2019मध्ये विद्यापीठाची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर व्यक्त केली होती.

First published: April 14, 2021, 7:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या