S M L

रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली

कुणाच्या मागणीवरून नाही तर शांतता प्रिय मुस्लिम धर्मीयांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 11:18 PM IST

रमजानच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली

जम्मू-काश्मीर, 16 मे : रमजान महिन्याच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात ऑपरेशन करू नका असे आदेश केंद्र सरकार गृह मंत्रालयाने  सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.

मुस्लिमांना रमजानच्या पवित्र महिन्यात अहिंसक वातावरण मिळाले पाहिजे. निष्पाप लोकांचे प्राण वाचवा..शांती प्रिय मुस्लिमांच्या हक्कांचे संरक्षण करा असे गृह मंत्रालयने आदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याच बोललं जातंय. पण सरकारने हा आरोप फेटाळुन लावला आहे.

कुणाच्या मागणीवरून नाही तर शांतता प्रिय मुस्लिम धर्मीयांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

लष्करी कॅम्पवर हल्ला झाला किंवा अतिरेक्यांनी आगळीक केली तर प्रतिउत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगळ्या नजरेतून याकडे पाहू नये असं सरकारने स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 11:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close