जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, हिजबुलचे 2 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, हिजबुलचे 2 दहशतवादी ठार

  • Share this:

श्रीनगर, 05 जुलै : भारत सध्या एकवेळी तीन मोठ्या आव्हानांच्या सामना करत आहे. लडाखच्या सीमेवर भारत-चीन संघर्ष, कोरोना व्हायरस आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं सुरू असलेला दहशतवाद्यांच्या कुरघोडींचाा सामना करत आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये शनिवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन हिजबुलचे दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

हे वाचा-‘हे’ ऐतिहासिक शहर हादरलं; तासाभरात सापडले 5 बेवारस मृतदेह, होणार कोरोना चाचणी

हे वाचा-फक्त 10 सेकंदात भारताच्या लढाऊ विमानांची धडक, हे PHOTOS पाहून चीनला भरेल धडकी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेले दहशतवादी हिजबुल संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एक दहशतवादी अली भाई उर्फ ​​हैदर हा परदेशी होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 5, 2020, 8:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या