विदर्भात आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार!

विदर्भात आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार!

उन्हाच्या तडाख्यामुळे आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार

  • Share this:

02 एप्रिल : उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील राज्य बोर्डाच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. दुपारच्या सत्रातील शाळा आता सकाळी भरवण्यात येणार आहेत. उद्यापासून तत्काळ या निर्णयाची अंमलबवणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. शनिवारी दुपारी नागपूरचं तापमान 42.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुढचे काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयानं शाळा केवळ सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे निर्देश दिलेत.

प्रचंड उन्हामुळे विद्यार्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच येत्या शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता राज्यातील इतर शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. तर विदर्भातील शाळा मात्र 27 जूनला सुरू होणार आहेत. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शाळा उशिराने सुरू होणार असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 04:05 PM IST

ताज्या बातम्या