Home /News /news /

राज्यात वाजली शाळांची घंटा; पुण्यात मात्र शाळांवर निर्बंध कायम; नक्की काय आहे कारण

राज्यात वाजली शाळांची घंटा; पुण्यात मात्र शाळांवर निर्बंध कायम; नक्की काय आहे कारण

पुण्यात शाळांवर निर्बंध कायम आहेत. शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत.

    पुणे, 16 जुलै: कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं (School and college) बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) अवलंब केला, पण अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यानं त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू (Offline school open) करण्यात आल्या आहेत. मात्र पुण्यात शाळांवर निर्बंध कायम आहेत. शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्यभरात कोरोनाचा आकडा जरी घटत असला तरी काही वैज्ञानिकांकडून तिसऱ्या लाटेसंदर्भात (Third wave) इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात जुलै महिनाभर निबंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या लागू असलेले नियमच कायम राहणार असल्याचं नव्या आदेशात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) तेच निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत. तसंच पर्यटन स्थळी बंदीच असेल. हे वाचा - Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य पुणे शहरात positivity दर 5 टक्क्यांच्या खालीच आहे मात्र असं असूनही बंधनं शिथील करायला प्रशासन तयार नाही. आज पालकमंत्री अजित पवार हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतील. मात्र पुणे पालिकेनं आधीच आदेश काढून निर्बंध कायम राहतील असे आदेश काढले आहेत.त्यामुळे आता शाळाही पुढील आदेश येतपर्यंत बंदच असणार आहेत. राज्यात कालपासून एकूण 5 हजार 947 शाळा सुरू झाल्या आहेत. काल पहिल्याचं दिवशी एकूण 4 लाख 16 हजार 599 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. कोविड मुक्त ग्रामीण भागात 15 जुलै पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड वर्षांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर राज्यात प्रथमच ऑफलाईन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Jobs, Pune, Ssc board

    पुढील बातम्या