Home /News /news /

धक्कादायक: शिक्षकच निघाला नराधम, सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

धक्कादायक: शिक्षकच निघाला नराधम, सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

कल्याण मोहने परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

    कल्याण,22 फेब्रुवारी: कल्याण मोहने परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षकाने शाळेतील सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची टिटवाळा पोलिसांनी गंभीर घेतली असून आरोपी शिक्षकाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलीसुद्धा आत्ता सुरक्षीत नाहीत. शिक्षकच भक्षक बनल्याने अशा भक्षक शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय मेटकर असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याला शाळा प्रशासनाने निलंबित केले आहे. आरोपी शिक्षक विजय मेटकर हा काही महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिंनींवर लैगिंक अत्याचार करत होता. एका पीडितेने हा घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आरोपीने एकाच विद्यार्थिनीसोबत नव्हे तर तब्बल सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरून अमोल कोल्हे आणि खोतकरांमधील मतभेद चव्हाट्यावर पीडित मुलींनी हा प्रकार कोणाला सांगू नये, त्यासाठी आरोपी विद्यार्थिनींना धमकी देत होता. शिक्षकाचा भंडाफोड होताच शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी शाळेतील सर्व मुलींच्या पालकांना विश्वासात घेत या प्रकरणी शिक्षक मेटकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कल्याण कोर्टात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नराधम शिक्षकाने अजून किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याबाबत पोलिस शोध घेत आहेत. 'बायको देता का बायको..' सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकास बेदम मारहाण
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या