News18 Lokmat

गुजरातमध्ये गरबा बघितला म्हणून दलित तरुणाची हत्या

दलितांना गरबा पाहण्याचा अधिकार नाही असं आरोपीचं म्हणणं होतं. त्याने जयेश सोलंकी या दलित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिथे आपल्या साथीदारांना बोलावून घेतलं आणि जयेशला बेदम मारहाण केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 06:06 PM IST

गुजरातमध्ये गरबा बघितला म्हणून दलित तरुणाची हत्या

02 आॅक्टोबर : गुजरातच्या आनंद जिल्ह्यात गरबा कार्यक्रमात सहभागी झाला म्हणून सवर्ण पटेल समुदायाच्या समुहाने एका 21 वर्षीय दलित तरुणाला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडलीये. या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसऱ्या एका घटनेत दलित तरुणाने मिशा ठेवल्यामुळे मारहाण करण्यात आलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश सोलंकी हा त्याचा नातेवाईक प्रकाश सोलंकी आणि दोन अन्य दलित व्यक्ती भद्रानिया गावाच्या एका मंदिराजवळ असलेल्या आपल्या घराबाहेर बसले होते. तेव्हा एका व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ केली होती.

भद्रान पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, दलितांना गरबा पाहण्याचा अधिकार नाही असं आरोपीचं म्हणणं होतं. त्याने जयेश सोलंकी या दलित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिथे आपल्या साथीदारांना बोलावून घेतलं आणि जयेशला बेदम मारहाण केली. या समुहाने जयेशचं डोकं भिंतीवर आदळलं. यात तो गंभीर जखमी झाला. जयेशला करमसाड येथील एका रुग्णालयात दाखल केलं असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

'पूर्व नियोजित हल्ला नाही'

पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. तसंच अॅट्रोसिटी दाखल करण्यात आलाय. हा काही पूर्व-नियोजित हल्ला नव्हता अशी माहितीही पोलीस उपाधिक्षक ए एम पटेल यांनी दिला.

Loading...

मिशा ठेवल्या म्हणून दलित तरुणाला मारहाण

सप्टेंबर महिन्यात 29 तारखेला भरत सिंह वाघेला नावाच्या व्यक्तिने लाॅचा विद्यार्थी कृणाल महेरियाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आलीये. वाघेला याने मी मिशा ठेवल्या म्हणून मारहाण केली असा आरोप केलाय.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...