मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाईन पेपरतपासणी कंत्राटात घोटाळा, मुणगेकरांचा आरोप

मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाईन पेपरतपासणी कंत्राटात घोटाळा, मुणगेकरांचा आरोप

माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपरतपासणीचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

  • Share this:

26 आॅक्टोबर : माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपरतपासणीचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

ज्या कंपनीला पेपर तपासण्याची जबाबदारी दिलीये त्या मेरीट ट्रॅक कंपनीच्या न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी मुणगेकरांनी केली आहे. ऑक्टोबरसाठी होणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षा नको अशी मागणीही भालचंद्र मुणगेकर यांनी केलीय.

आमचा ऑनलाईनला पाठिंबा आहे पण ऑनलाईन परीक्षा एप्रिल-मे मध्ये घ्यावी, मेरीट ट्रॅक कंपनीची न्यायालयीन चौकशी करावी, अजूनही साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ झालेत याला जबाबदार कोण आणि 28 हजार विद्यार्थ्यांचं पूनर्मुल्यांकन बाकी आहे असंही मुणगेकरांनी म्हटलंय.

First published: October 26, 2017, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading